कार्तिक आर्यनच्या आयुष्यात 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री? गोव्यातील व्हेकेशनच्या फोटोंनी उघड केलं गुपित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 11:30 IST2026-01-06T10:56:21+5:302026-01-06T11:30:45+5:30
कार्तिक आर्यन पुन्हा एकदा त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे.

कार्तिक आर्यनच्या आयुष्यात 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री? गोव्यातील व्हेकेशनच्या फोटोंनी उघड केलं गुपित
Kartik Aaryan's Goa Vacation Sparks Dating Rumors : बॉलिवूडचा 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' कार्तिक आर्यन पुन्हा एकदा त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे. सारा अली खान, अनन्या पांडे आणि अलीकडेच श्रीलीला या अभिनेत्रींंशी नाव जोडले गेल्यानंतर, आता एका विदेशी सुंदरीसोबत कार्तिकचं नाव जोडलं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंनी कार्तिकच्या आयुष्यात कोणीतरी खास असल्याची चर्चा रंगली आहे.
नवीन वर्षाच्या निमित्ताने कार्तिक आर्यन गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत होता. त्याने इंस्टाग्रामवर सूर्यास्ताचा आनंद घेतानाचे काही फोटो शेअर केले. मात्र, खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा 'रेडिट'वर करिना कुबिलियुट नावाच्या महिलेचे फोटो व्हायरल झाले. कार्तिक आणि करिना दोघांनीही शेअर केलेल्या फोटोमध्ये बॅकग्राउंडला एकच 'व्हॉलीबॉल कोर्ट' दिसत आहे. दोघांच्याही बीच बेडवर सारखेच टॉवेल ठेवलेले पाहायला मिळाले. दोघांनीही एकाच वेळी गोव्यातील त्याच समुद्रकिनाऱ्याचे फोटो पोस्ट केले होते.

फॉलो-अनफॉलोचा खेळ!
चाहत्यांनी केवळ फोटोच नव्हे, तर त्यांच्या सोशल मीडिया हालचालींवरही लक्ष ठेवले. समोर आलेल्या स्क्रीनशॉट्सनुसार, कार्तिक आर्यन याआधी करिनाला फॉलो करत होता. मात्र, लिंक-अपच्या अफवा पसरू लागताच त्याने तिला अनफॉलो केले. करिनानेही कार्तिकला अनफॉलो केल्याचे दिसून आले. यामुळे चाहत्यांचा संशय अधिकच बळावला आहे.

नक्की कोण आहे ही 'मिस्ट्री गर्ल'?
करिना कुबिलियुट ही एक मॉडेल असल्याचे समजते. कार्तिक आणि तिची भेट कशी झाली आणि त्यांच्यात मैत्रीपलीकडे काही आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.