कार्तिक आर्यनने इम्तियाज अलीसोबत उदयपूरमध्ये ह्या पदार्थांवर मारला ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 09:00 PM2019-04-24T21:00:00+5:302019-04-24T21:00:00+5:30

कार्तिक आर्यन व इम्तियाज अली यांनी उदयपूरमध्ये राजस्थानी थाळीचा आस्वाद घेतला.

Kartik Aaryan enjoys local delicacy with Imtiaz Ali in Udaipur | कार्तिक आर्यनने इम्तियाज अलीसोबत उदयपूरमध्ये ह्या पदार्थांवर मारला ताव

कार्तिक आर्यनने इम्तियाज अलीसोबत उदयपूरमध्ये ह्या पदार्थांवर मारला ताव

googlenewsNext
ठळक मुद्देकार्तिक आर्यन व इम्तियाज अली यांनी उदयपूरमध्ये घेतला राजस्थानी थाळीचा आस्वाद

कलाकारांना फिट राहण्यासाठी व्यायामासोबत डाएटही करावा लागतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या आवडत्या पदार्थांचाही त्याग करावा लागतो. मात्र नुकतेच बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने डाएट वगैरे विसरून विविध पदार्थांसोबत तूप खिचडीवर ताव मारला आहे. यावेळी त्याच्यासोबत दिग्दर्शक इम्तियाज अली होते. कार्तिकने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

कार्तिक आर्यन इम्तियाज अली दिग्दर्शित लव आज कल २ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि त्याच्यासोबत या चित्रपटात सारा अली खान दिसणार आहे. या चित्रपटाचे उदयपूरमध्ये चित्रीकरण सुरू आहे.

चित्रीकरणातून वेळ काढत चित्रपटाची टीम, कार्तिक आर्यन व इम्तियाज अली यांनी उदयपूरमध्ये राजस्थानी थाळीचा आस्वाद घेतला. यावेळी भरपूर तूप घालून खिचडीचाही मनमुराद आनंद लुटला. हा व्हिडिओ कार्तिकने शेअर केला आहे.

कार्तिक आर्यन व कृति सेनॉनचा 'लुका छुपी' चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. इतकेच नाही तर या चित्रपटातील कृति व कार्तिकची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली.

आता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० दिवस पूर्ण करत देशभरात जवळपास ९५ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात बॉक्स ऑफिसवर ११५ कोटींचा बिझनेस केला आहे.

लुका छुपीच्या यशामुळे कार्तिक खूपच खूश आहे. मात्र सध्या तो सातवे आसमानवर आहे. कारण बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी या गोष्टींची दखल घेत त्याची प्रशंसा केली आहे.

Web Title: Kartik Aaryan enjoys local delicacy with Imtiaz Ali in Udaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.