'सत्य प्रेम की कथा'नंतर कार्तिक आर्यनला लागली लॉटरी, कबीर खानसोबत सुरु केलं 'चंदू चॅम्पियन'चं शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 01:33 PM2023-07-13T13:33:39+5:302023-07-13T13:36:05+5:30

कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो दिग्दर्शक कबीर खानसोबत दिसत आहे.

kartik aaryan begins shooting for chandu champion with kabir khan said most challenging and exciting journey begins | 'सत्य प्रेम की कथा'नंतर कार्तिक आर्यनला लागली लॉटरी, कबीर खानसोबत सुरु केलं 'चंदू चॅम्पियन'चं शूटिंग

'सत्य प्रेम की कथा'नंतर कार्तिक आर्यनला लागली लॉटरी, कबीर खानसोबत सुरु केलं 'चंदू चॅम्पियन'चं शूटिंग

googlenewsNext

अभिनेता कार्तिक आर्यनचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणीही दिसणार आहे.  कियारा आणि कार्तिकच्या जोडीने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सत्यप्रेम चित्रपटाची कथा हिट ठरला आहे. दरम्यान, कार्तिक आर्यनबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या नवीन सिनेमाचे शूटिंग सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे.  कार्तिक आर्यननेही एक पोस्ट शेअर करून 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाची घोषणा केली आहे.

 कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो दिग्दर्शक कबीर खानसोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करताना कार्तिक आर्यनने लिहिले, 'माझ्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक आणि रोमांचक प्रवासला सुरूवात झाली आहे. कार्तिक आर्यनने त्याचा आगामी चित्रपट 'चंदू चॅम्पियन'चे शूटिंग सुरू केल्याचे या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे. कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. मात्र अद्याप या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीचे नाव समोर आलेले नाही. रिपोर्टनुसार यात श्रद्धा कपूरला साइन इन केले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आता या चित्रपटात कार्तिक आर्यन कोणासोबत रोमान्स करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. मुरलीकांत पेटकर हे सुवर्णपदक विजेते असून त्यांनी 1972 मध्ये जर्मनी येथे झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. मीडिया रिपोर्टनुसार हा चित्रपट 14 जून 2024 पर्यंत रिलीज होऊ शकतो.  कार्तिक आणि कियारा या जोडीच्या  सत्यप्रेम की कथा या चित्रपटाने जगभरात 100 कोटींचा आकडा पार केला आहे. याआधी दोघेही भूल भुलैया २ मध्ये दिसले होते. हा सिनेमाही सुपरहिट ठरला होता.

Web Title: kartik aaryan begins shooting for chandu champion with kabir khan said most challenging and exciting journey begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.