कार्तिक आर्यन दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 06:04 PM2023-10-26T18:04:00+5:302023-10-26T18:05:06+5:30

कार्तिकने पुण्यातील प्रसिद्ध अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी कार्तिक नतमस्तक झाला.

Karthik Aaryan seeks blessings of shrimant Dagdusheth Halwai ganpati mandir photo viral | कार्तिक आर्यन दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक, फोटो व्हायरल

कार्तिक आर्यन दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक, फोटो व्हायरल

कार्तिक आर्यन हा सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. प्यार का पंचनामा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या कार्तिकने नंतर अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं. 'शेहजादा', 'भुल भुलैय्या', 'सोनू की टिटू की स्वीटी' अशा चित्रपटांतून कार्तिक विविधांगी भूमिका साकारताना दिसला. कार्तिकने अभिनयाची जादू करत प्रेक्षकांच्या मनात स्वत:साठी वेगळं स्थान निर्माण केलं. 

नुकतंच कार्तिकने पुण्यातील प्रसिद्ध अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी कार्तिक नतमस्तक झाला. कार्तिकचे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी कार्तिक पारंपरिक वेशात गेला होता. मंडळाकडून त्याला गणपतीची मुर्तीही भेट म्हणून देण्यात आली. काही दिवसांपूर्वीच आर्यनने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं. 

कार्तिक 'आशिकी ३' आणि 'हेरा फेरी ३' या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अलिकडेच त्याचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉलिवूडमधील करिअरप्रमाणेच कार्तिक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. सारा अली खान आणि क्रिती सेनॉनबरोबर त्याचं नाव जोडलं गेलं होतं. काही दिवसांपूर्वी कार्तिक हृतिक रोशनची बहीण पश्मिनाच्या घराबाहेर दिसला होता. त्यानंतर तो तारा सुतारीयाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

Web Title: Karthik Aaryan seeks blessings of shrimant Dagdusheth Halwai ganpati mandir photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.