‘पद्मावती’चे फर्स्ट लूक रिलीज होताच करणी सेना ‘अॅक्टिव्ह’; रणवीर सिंहला दिली अप्रत्यक्ष धमकी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 11:44 IST2017-09-22T06:10:35+5:302017-09-22T11:44:56+5:30
‘पद्मावती’चे पहिले पोस्टर जारी होताच, राजपूत करणी सेना पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे. होय,एकीकडे ‘पद्मावती’च्या फर्स्ट लूकची प्रशंसा होतेयं ...

‘पद्मावती’चे फर्स्ट लूक रिलीज होताच करणी सेना ‘अॅक्टिव्ह’; रणवीर सिंहला दिली अप्रत्यक्ष धमकी!!
‘ द्मावती’चे पहिले पोस्टर जारी होताच, राजपूत करणी सेना पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे. होय,एकीकडे ‘पद्मावती’च्या फर्स्ट लूकची प्रशंसा होतेयं तर दुसरीकडे राजपूत करणी सेनेने ‘इशारों इशारों में’ धमक्या देणे सुरु केले आहे. ‘पद्मावती’चे पोस्टर इकडे रिलीज झाले आणि तिकडे या चित्रपटात अलाऊद्दीन खिल्जीची भूमिका साकारणा-या रणवीर सिंहला धमकी मिळाली.
काल रणवीर सिंहने आपल्या twitter अकाऊंटवर ‘पद्मावती’चे पोस्टर पोस्ट केले होते. ‘रानी पद्मावती पधार रही है....सूर्याेदय के साथ...’ असे कॅप्शन या पोस्टसोबत त्याने लिहिले होते. याचे उत्तर देताना राजपूत करणी सेनेने मात्र रणवीरला अप्रत्यक्ष धमकी देऊन टाकली. ‘रानी पद्मावती अगर रानी पद्मावती बनकर पधार रही हैं तो उनका स्वागत हैं, वरना रुकावट के लिए खेद होगा’, असे राजपूत करणी सेनेने आपल्या twitter अकाऊंटवर लिहिले.
![]()
केवळ एवढेच नाही तर ‘पद्मावती’त तथ्यांना जराही विकृत केले गेले तर आम्ही या चित्रपटाचे स्क्रिनिंग हाणून पाडू, असा इशाराही करणी सेनेने दिला आहे. करणी सेनेचे संरक्षक व संस्थापक लोकेन्द्र सिंह काल्वी यांनी सांगितले की, २० दिवंसापूर्वी भन्साळींच्या टीमपैकी कुणीतरी फोन करून आम्हाला चित्रपट बघण्यास म्हटले होते. पण आम्ही त्यांना हा चित्रपट आम्हाला नाही तर इतिहास संशोधक व बुद्धिजीवींना दाखवा असे सांगितले. त्यानंतर आमचे बोलणे झाले नाही.
ALSO READ : ‘या’ खास कारणामुळे नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी जारी केले गेले ‘पद्मावती’चे पोस्टर!
‘पद्मावती’त राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा आक्षेप घेत गत जानेवारीच्या अखेरिस करणी सेनेने राजस्थानच्या जयपूर नजिक जयगढ येथे ‘पद्मावती’च्या सेटवर धिंगाणा घातला होता. यादरम्यान ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना मारहाणही करण्यात आली होती. यानंतर ‘पद्मावती’चा सेट कोल्हापुरात हलवण्यात आला होता. पण अलीकडे काही अज्ञात व्यक्तिंनी या सेटची तोडफोड करत त्याल आग लावण्याचा प्रयत्न केला होता. या पश्चात ‘पद्मावती’मध्ये काहीही आक्षेपार्ह असणार नाही. राणी पद्मावती हिच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, असेही काहीही पडद्यावर दाखवण्याचे आमचे प्रयत्न नाहीत, असे भन्साळी यांनी स्पष्ट केल्यानंतर हा वाद मिटला होता.पण कदाचित चित्रपट पाहिल्याशिवाय करणी सेनेचे समाधान होणार नाही, असे दिसतेय.