​आमिर खानसोबत पंगा घेतल्याने केआरकेचे ट्विटर अकाऊंट करण्यात आले बंद... नेटिझन म्हणतात, आम्हाला मिळाले दिवाळीचे बेस्ट गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 12:02 IST2017-10-19T06:32:21+5:302017-10-19T12:02:21+5:30

केआरके उर्फ कमाल आर खान आणि वाद हे काही नवीन नाही. केआरके नेहमीच त्याच्या ट्विटर अकाऊंटवर काही ना काही ...

KARK's Twitter account was closed due to a scandal with Aamir Khan ... Netizen says we get the best gift of Diwali | ​आमिर खानसोबत पंगा घेतल्याने केआरकेचे ट्विटर अकाऊंट करण्यात आले बंद... नेटिझन म्हणतात, आम्हाला मिळाले दिवाळीचे बेस्ट गिफ्ट

​आमिर खानसोबत पंगा घेतल्याने केआरकेचे ट्विटर अकाऊंट करण्यात आले बंद... नेटिझन म्हणतात, आम्हाला मिळाले दिवाळीचे बेस्ट गिफ्ट

आरके उर्फ कमाल आर खान आणि वाद हे काही नवीन नाही. केआरके नेहमीच त्याच्या ट्विटर अकाऊंटवर काही ना काही पोस्ट करून वाद निर्माण करतो. त्यामुळे बॉलिवूडमधील अनेकांसोबत त्याची आजवर भांडणे झाली आहेत. पोस्टर बॉईज या चित्रपटाच्या वेळीस देखील त्याने या चित्रपटाबाबत वाईट गोष्टी लिहिल्या होत्या. त्यावर या चित्रपटाचा दिग्दर्शक-निर्माता श्रेयस तळपदे याने तुझ्या घरात घूसून तुला मारेल अशी धमकीच केआरकेला दिली होती. कोणताही चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी केआरके त्याचे अतिशय वाईट परीक्षण ट्विटरवर पोस्ट करतो. या आठवड्यात सिक्रेट सुपरस्टार हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाविषयी देखील केआरकेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले होते. केआरकेने म्हटले होते की, सिक्रेट सुपरस्टार हा चित्रपट अतिशय वाईट असून वडील आईप्रमाणे आपल्या मुलांवर प्रेम करत नाहीत हे या चित्रपटाद्वारे आमिर खान सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. अडीज तास हा चित्रपट आपल्याला अक्षरशः टॉचर करणार आहे. त्यामुळे या चित्रपटाला चित्रपटगृहं मिळू नयेत. मुलीच्या करियरला विरोध करणाऱ्या पित्याला आई आणि मुलगी सोडतात आणि मग ती मुलगी सुपरस्टार बनते अशी या चित्रपटाची कथा आहे. 
केआरकेने आजवर बॉलिवूडमध्ये अनेक जणांसोबत पंगा घेतला आहे. पण आमिर खानसोबत पंगा घेणे त्याला चांगलेच महाग पडले आहे. या विरोधात सिक्रेट सुपरस्टारच्या टीमने तक्रार दाखल केली होती. आता केआरकेचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे. त्याच्या अकाऊंटला जवळजवळ ६० लाख फॉलोव्हर्स होते. पण आता यावर केआरके शांत बसणार नाहीये. फेसबुक अकाऊंट आणि युट्युब चॅनेल द्वारे तो सगळ्या चित्रपटांबद्दल त्याचे मत देणार असल्याचे त्याने म्हटले आहे. एवढेच नव्हे तर तो या विरोधात कायदेशीर लढाईदेखील लढणार असल्याचे त्याने म्हटले आहे. पण केआरकेचे अकाऊंट बंद झाल्यामुळे सगळेच प्रचंड खूश आहेत. सामान्य लोकच नव्हे तर बॉलिवूडमधील मंडळीदेखील आनंदाने याबद्दल ट्वीट करत आहेत. विक्रम भट्टने ट्वीट करून खरेच केआरकेचे अकाऊंट बंद झाले का असे नेटिझनना विचारले आहे. अनेक नेटिझनने दिवाळीचे गिफ्ट आम्हाला मिळाले असून आता आमच्या वर्षाची सुरुवात खूप चांगली झाली असल्याचे म्हटले आहे. 

Also Read : केआरके पुन्हा बरळला म्हणे करिना कपूर आणि मी चार वर्ष रिलेशनशीपमध्ये होतो

Web Title: KARK's Twitter account was closed due to a scandal with Aamir Khan ... Netizen says we get the best gift of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.