/>पूर्वाश्रमीचे प्रियकर-प्रेयसी राहून चुकलेले शाहीद कपूर आणि करिना कपूर यांचे फाटले. पण अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगी हे दोघेही परस्परांची प्रशंसा करताना दिसले. आता या दोघांचे अतिशय जवळचे नातेवाईक एका चित्रपटात एकत्र दिसणार असल्याची बातमी आहे. आम्ही बोलतोय, ते करिना कपूरची सावत्र मुलगी अर्थात सैफ व अमृता सिंह यांची मुलगी सारा खान आणि शाहीदचा सावत्र भाऊ ईशान खट्टर या दोघांनी. सारा व ईशान हे दोघेही सन २०१२ च्या एका सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वलमध्ये दिसणार असल्याची बातमी आहे. होय, हा चित्रपट म्हणजे ‘स्टुडंट आॅफ दी ईयर’चा सिक्वल. अद्याप याबाबतची आॅफिशिअल घोषणा झालेली नाही. तेव्हा बघूया...