​करिना म्हणते, प्रियंकाने जे केले ते मी करू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 17:49 IST2016-06-28T12:19:55+5:302016-06-28T17:49:55+5:30

अभिनेत्री करिना कपूर स्वत:ला आळशी मानते. होय, हे आमचे नाही तर स्वत: तिचेच शब्द आहेत. प्रियंका चोपडा हॉलिवूडमध्ये गेली. ...

Karina says, I can not do what Priyanka did | ​करिना म्हणते, प्रियंकाने जे केले ते मी करू शकत नाही

​करिना म्हणते, प्रियंकाने जे केले ते मी करू शकत नाही

िनेत्री करिना कपूर स्वत:ला आळशी मानते. होय, हे आमचे नाही तर स्वत: तिचेच शब्द आहेत. प्रियंका चोपडा हॉलिवूडमध्ये गेली. नवी ओळख मिळवली. पण करिनाला यात काहीही इंटरेस्ट नाही. म्हणूनच जे प्रियंकाने केले ते मी कधीही करू शकत नाही. कारण माझा प्राधान्यक्रम काहीसा वेगळा आहे, असे करिना म्हणाली. एका मुलाखतीत करिना स्वत:बद्दल भरभरून बोलली. प्रियंकाने जे काही केले ते अद्भूत आहे. पण मी प्रियंकासारखे अजिबात करू शकत नाही. मला एक कामकाजी विवाहित महिला बनण्यात अधिक रस आहे. माझ्या जबाबदाºया, माझ्या आवडी वेगळ्या आहेत. माझा नवरा आहे आणि मला कुटुंब वाढवायचे आहे. हे सगळे काही सोडून मी लॉस एंजिलिसला जाऊ शकत नाही. अतिमहत्त्वांकाक्षी असावे. पण या महत्त्वाकांक्षांचा पाठपुरावा करण्यासाठी त्याग, समर्पण, जिद्द गरजेची आहे. याबाबतीत कदाचित मी आळशी आहे. माझ्या हिमतीवर मी जे काही मिळवलेयं, त्यात मी समाधानी आणि आनंदी आहे, असे करिना म्हणाली.  

Web Title: Karina says, I can not do what Priyanka did

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.