​का केली शाहरुखने बराक ओबामावर टीका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2016 10:14 IST2016-11-12T10:14:47+5:302016-11-12T10:14:47+5:30

वाचून हैराण झालात ना? संपूर्ण जगात अत्यंत प्रसिद्ध आणि चांगली प्रतिमा असणाऱ्या अमेरिकेच्या या मावळत्या अध्यक्षावर शाहरुख का बरं ...

Kareli Shahrukh criticizes Barack Obama? | ​का केली शाहरुखने बराक ओबामावर टीका?

​का केली शाहरुखने बराक ओबामावर टीका?

चून हैराण झालात ना? संपूर्ण जगात अत्यंत प्रसिद्ध आणि चांगली प्रतिमा असणाऱ्या अमेरिकेच्या या मावळत्या अध्यक्षावर शाहरुख का बरं टीका करीत असेल?

शाहरुख खान त्याच्या विनोदबुद्धीसाठी प्रसिद्ध आहे. मग ते ट्विटर असो लाईव्ह इंटरव्ह्युव, एसआरकेचे ‘वन लाईनर्स’ प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर हसू आणतात. त्याच्या या ‘सेन्स आॅफ ह्युमर’चा वापर करून त्याने ओबामांवर टीका केली.

त्याचे झाले असे, एका कार्यक्रमात जेव्हा साजीद खान आणि रितेश देशमुख यांनी शाहरुखला सांगितले की, बराक ओबामानेसुद्धा ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’मधील त्याचा प्रसिद्ध डायलॉग ‘बडे बडे देशो में, ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है’ एकदा वापरला आहे.

यावर शाहरुखने लागलीच म्हटले की, ‘होय. ही फार मजेशीर गोष्ट आहे. पण मला असे वाटते की, ते अधिक चांगल्या प्रकारे हा डायलॉग बोलू शकले असते. त्यांची डायलॉग डिलिव्हरी एवढी खास नव्हती.’

                                   
                                              वॉर : बराक ओबामा आणि शाहरुख खान

किंग खानच्या अशा विनोदी शेऱ्यावर मग एकच हशा पिकला. त्याने बराक ओबामांनाही नाही सोडले. बरं येथे गंमतीचा भाग सोडला तर असे वाटते की, शाहरुखने बहुधा अमेरिकेवर अप्रत्यक्षरीत्या त्याचा राग व्यक्त केला.

तुम्हाला चांगलेच आठवत असेल की, दोन वेळेस त्याला अमेरिकेत विमानतळावर चौकशीसाठी तासन्तास थांबून ठेवण्यात आलेले आहे. केवळ आपल्या नावामुळे वारंवार अशी वागणूक मिळत असल्याचे त्याला वाटते.

त्यामुळे संधी मिळाल्यावर त्याने लगेच ओबामांवर निशाणा साधला. वाह शाहरुख! एकाच दगडात दोन पक्षी कसे मारावे हे तुझ्याकडून शिकावे. लवकरच तो आपल्याला गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डिअर जिंदगी’मध्ये दिसणार आहे. 

Web Title: Kareli Shahrukh criticizes Barack Obama?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.