​१६ वर्षांनंतर करिनाचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 12:13 IST2016-06-23T06:43:49+5:302016-06-23T12:13:49+5:30

तब्बल सोळा वर्षांनंतर बॉलीवूडची ‘बेबो’ करिना कपूरने एक खुलासा केला असून तो ऐकून तिचे डाय हार्ड फॅन्ससुद्धा चकित झाले ...

Kareena's shocking disclosure 16 years later | ​१६ वर्षांनंतर करिनाचा धक्कादायक खुलासा

​१६ वर्षांनंतर करिनाचा धक्कादायक खुलासा

्बल सोळा वर्षांनंतर बॉलीवूडची ‘बेबो’ करिना कपूरने एक खुलासा केला असून तो ऐकून तिचे डाय हार्ड फॅन्ससुद्धा चकित झाले आहेत.

असं काय सांगितले या मॅडमने, असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला सोळा वर्ष मागे जावे लागेल.

तुम्हाला चांगलेच आठवत असेल २००० साली हृतिक रोशनने इंडस्ट्रीमध्ये ‘न भुतो, न भविष्य’ असे पदार्पण केले. या चित्रपटातून अमिषाऐवजी करिना कपूर डेब्यू करणार होती हे जगजाहिर आहे.  

पण करिनाने सांगितले की, मी जरी तेव्हा तो चित्रपट करू नाही शकले; परंतु फिल्ममध्ये एका सीनमध्ये मी काम केले आहे.

सगळ्यांनी ‘कहो ना प्यार है’ पाहिलेला असेल मात्र, एवढे वर्षे कोणालाच बेबो कशी दिसली नाही? यावेळी जर तुम्ही नीट लक्ष देऊन चित्रपट पाहिला दिसेल की, एका सीनमध्ये जेव्हा हृतिक-अमिषा समुद्रकिनाºयावरील दगडामागे लपतात. या सीनमध्ये अमिषा नाही तर चक्क करिना आहे.

विश्वास नाही बसत? घ्या मग हा पुरावा....

bebo1


bebo


bebo3

Web Title: Kareena's shocking disclosure 16 years later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.