करिनाचा ‘गर्ल्स डे आऊट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 15:56 IST2016-10-27T15:56:22+5:302016-10-27T15:56:22+5:30

सेलिब्रिटींना आऊटिंग करणं प्रचंड आवडतं. त्यात ती आऊटिंग फ्रेंड्ससोबत असेल तर मग त्याची मजा काही औरच असते. नाही का? ...

Kareena's 'Girls Day Out'! | करिनाचा ‘गर्ल्स डे आऊट’!

करिनाचा ‘गर्ल्स डे आऊट’!

लिब्रिटींना आऊटिंग करणं प्रचंड आवडतं. त्यात ती आऊटिंग फ्रेंड्ससोबत असेल तर मग त्याची मजा काही औरच असते. नाही का? मग अशावेळी बेबो तरी कशी मागे राहील? 

‘बेगम आॅफ पतौडी’ करिना कपूर खान ही सध्या तिचे गरोदरपण एन्जॉय करतेय. तिच्या फॅशन्स आणि तिच्या आऊटिंग पाहता ती गरोदरपणातील ट्रेंड सेट करत आहे, असे वाटतेय. नुकतीच ती तिच्या जवळच्या फ्रेंड्ससोबत आऊटिंगसाठी गेली होती.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले तिचे फोटो पाहिल्यावर वाटते की, स्त्रीच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा ती मस्त एन्जॉय करते आहे. वांद्रे येथील प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये ती बहीण करिश्मा कपूर आणि ‘वीरें दी वेडिंग’ निर्माती रिहा कपूर यांच्यासोबत लंच डेटवर गेली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये करिना ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट’ या क म्फर्टेबल ड्रेसिंगमध्ये दिसत आहे. 

करिना कपूर खान ही ‘वीरें दी वेडिंग’ चित्रपटामुळे मध्यंतरी चर्चेत होती. तिने सातव्या महिन्यापर्यंत या चित्रपटाची शूटिंग केली होती. आता ती मॅटर्निटी ब्रेकनंतर पुढील शूटिंग करणार आहे. यात सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिआ या देखील असणार आहेत. 

kareena kapoor khan

Web Title: Kareena's 'Girls Day Out'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.