दुसऱ्यांदा आई होणारी करिना म्हणते, सैफ अजिबात फिल्मी नाही..

By गीतांजली | Updated: October 24, 2020 13:13 IST2020-10-24T12:33:02+5:302020-10-24T13:13:20+5:30

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत

kareena told how saif ali khan reacted on hearing second pregnancy news | दुसऱ्यांदा आई होणारी करिना म्हणते, सैफ अजिबात फिल्मी नाही..

दुसऱ्यांदा आई होणारी करिना म्हणते, सैफ अजिबात फिल्मी नाही..

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. प्रेग्नेंन्सीच्या बातम्यांना घेऊन करिना सध्या चर्चेत आहे. करिना आणि सैफने काही महिन्यांपूर्वी ऑफिशियल अनाउंसमेंट केली.  करिना बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सैफ अली खानला जेव्हा करिना कपूरच्या दुसऱ्या  प्रेग्नन्सीबद्दल कळले तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती हे अभिनेत्रींनी सांगितले आहे.

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान करिना कपूरने सांगितले ज्यावेळी सैफ अली खानला दुसऱ्या प्रेग्नेंन्सीबाबत सांगितले तेव्हा त्याने काही फिल्मी रिअ‍ॅक्शन दिली नाही. तो अगदी नॉर्मल आणि रिलॅक्स होता. अभिनेत्री म्हणाली, दुर्दैवाने आमच्या घरात कुणी फिल्मी नाही. सैफ शांत आणि खुश होता. जसे मी त्याला सांगितले. हे काही प्लानमध्ये नव्हते पण हे काही असे होते की आम्हाला सेलिब्रेट करायचे होते. आम्ही याला पूर्णपणे एन्जॉय करतो आहे.  


अलीकडेच करिनान 'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग पूर्ण करुन मुंबईत परतली आहे. जवळपास एक महिना सैफ, करिना आणि तैमूर दिल्लीतील पतौडी पॅलेसमध्ये थांबले होते. शूटिंग पूर्ण झाल्यावर करिनाने एका पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. ''मी लाल सिंग चड्ढाचे शूटिंग पूर्ण केले. कठीण काळ होता मी प्रेग्नेंन्सी, भीती, मात्र यासगळ्या गोष्टी माझ्या ध्येयाला थांबवू शकल्या नाहीत. मी शूटिंग पूर्ण केले. सर्व काळजी घेत. आमिर खान आणि अव्दैत चंदन यांचे आभार. धन्यवाद टीम.'' असे या पोस्टमध्ये करिनाने लिहिले होते.

Web Title: kareena told how saif ali khan reacted on hearing second pregnancy news