करिना कपूरचा ‘हिरो’ सुमीत व्यास ‘या’अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ! ठरला सप्टेंबरचा मुहूर्त !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 15:01 IST2018-06-21T09:28:25+5:302018-06-21T15:01:55+5:30

करिना कपूरचा ‘हिरो’ लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आम्ही कुणाबद्दल बोलतोय तर करिनाचा ‘वीरे दी वेडिंग’मधला हिरो सुमीत व्यासबद्दल. होय, ...

Kareena Kapoor's 'Hero' is a wedding night with Sumeet Vyas Start of September! | करिना कपूरचा ‘हिरो’ सुमीत व्यास ‘या’अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ! ठरला सप्टेंबरचा मुहूर्त !!

करिना कपूरचा ‘हिरो’ सुमीत व्यास ‘या’अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ! ठरला सप्टेंबरचा मुहूर्त !!

िना कपूरचा ‘हिरो’ लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आम्ही कुणाबद्दल बोलतोय तर करिनाचा ‘वीरे दी वेडिंग’मधला हिरो सुमीत व्यासबद्दल. होय, येत्या सप्टेंबर महिन्यात सुमीत त्याची गर्लफ्रेन्ड एकता कौल हिच्यासोबत लग्न करणर आहे. एकता ही टीव्ही अभिनेत्री आहे. ‘मेरे अंगने में’ या मालिकेत ती दिसली होती. यात तिने रिया माथूर ही व्यक्तिरेखा साकारली होती.



मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, काही महिन्यांपूर्वी सुमीत व एकताच्या कुटुंबीयांनी या लग्नाला हिरवा कंदील दिला. दोन्ही कुटुंबाच्या सहमतीनंतर या लग्नाची तयारी सुरू झाल्याचे कळतेय. एकताचे अनेक नातेवाईक जम्मूला राहतात. त्यामुळे काश्मिरी पद्धतीने हे लग्न पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप या लग्नाची फायनल डेट आलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकताने इंडस्ट्रीतील आपल्या काही जवळच्या मित्रांना सप्टेंबरमधील तारखा लॉक करायला सांगितल्या आहेत. यावरून सप्टेंबर महिन्यात हे लग्न होईल, असा अंदाज आहे.



काही दिवसांपूर्वी एकताने सुमीतसोबतच्या नात्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले होते. काही सांकेतिक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर अचानक तिच्या व सुमीतच्या डेटींगच्या बातम्या समोर आल्या होत्या. आताश: हे नाते कुणापासूनही लपून राहिलेले नाही. अलीकडे एका मुलाखतीत सुमीतने एकतासोबतच्या नात्याची कबुली दिली होती. एका शोच्या प्रमो शूटदरम्यान मी व एकता पहिल्यांदा भेटलो होतो. पण त्यानंतर आम्ही आपआपल्या आयुष्यात बिझी झाालो. गतवर्षी एका मित्राच्या पार्टीत आम्ही पुन्हा भेटलो. यानंतर मी एका क्रिकेटवरचा रिअ‍ॅलिटी शो होस्ट करत होतो आणि ती त्या शोमधील एक स्पर्धक होती, असे त्याने सांगितले होते. 

ALSO READ : टीव्ही स्टार सुमीत व्यासचे नशीब फळफळले! करिना कपूरपाठोपाठ ‘या’ दिग्गज अभिनेत्रीसोबत करणार काम !

तुम्हाला ठाऊक असेलचं की, सुमीतचे पहिले लग्न झाले आहे. अभिनेत्री शिवानी टंकसाळे ही सुमीतची पहिली पत्नी. २०१० मध्ये सुमीत व शिवानी यांचे लग्न झाले होते़ तथापि २०१६ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.
सुमीत व्यास मुळात थिएटर आर्टिस्ट आहे. १६ व्या वर्षांपासून सुमीतने राज बब्बर यांच्या पत्नी नदिरा बब्बर यांच्या थिएटर ग्रूपसोबत काम करणे सुरू केले. २००७ मध्ये सुजीत सरकारने दिग्दर्शित केलेली एका जाहिरातील सुमीतला संधी मिळाली.  यानंतर तो अनेक टीव्ही मालिकेत दिसला. ‘परमनंट रूममेट्स’ ही त्याची वेबसीरिज प्रचंड गाजली. पुढे बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात त्याची वर्णी लागली. ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘औरंगजेब’, ‘सबकी बजेगी बँड’, ‘गुड्डू की गन’, ‘रिबन’ असे अनेक चित्रपट त्याने केले.  आता सुमीतला आघाडीच्या अभिनेत्रींसोबत चित्रपट मिळताहेत.

Web Title: Kareena Kapoor's 'Hero' is a wedding night with Sumeet Vyas Start of September!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.