सलमान खानच्या 'पवन पुत्र भाईजान'मधून करीना कपूरचा पत्ता कट, सिनेमात झाली साऊथच्या अभिनेत्रीची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 05:18 PM2023-03-25T17:18:46+5:302023-03-25T17:19:09+5:30

Pavanputra Bhaijan : 'पवनपुत्र भाईजान' हा चित्रपट सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाचा सीक्वल आहे.

Kareena Kapoor's address cut from Salman Khan's 'Pawan Putra Bhaijaan', South actress' entry in the film | सलमान खानच्या 'पवन पुत्र भाईजान'मधून करीना कपूरचा पत्ता कट, सिनेमात झाली साऊथच्या अभिनेत्रीची एन्ट्री

सलमान खानच्या 'पवन पुत्र भाईजान'मधून करीना कपूरचा पत्ता कट, सिनेमात झाली साऊथच्या अभिनेत्रीची एन्ट्री

googlenewsNext

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान(Salman Khan)चे 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ka Jaan) आणि 'टायगर ३' (Tiger 3) हे दोन चित्रपट २०२३ साली थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. चाहते त्यांच्या आवडत्या स्टारच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत कारण मागील वर्षी २०२२ मध्ये सलमान खानचा एकही चित्रपट रिलीज झालेला नाही. दरम्यान, आता सलमान खानच्या 'पवनपुत्र भाईजान' या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. विशेष म्हणजे 'पवनपुत्र भाईजान' हा चित्रपट सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाचा सीक्वल आहे. 

सलमान खान आणि करीना कपूरचा 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता आणि लोकांना तो खूप आवडला. तेव्हापासून लोक 'बजरंगी भाईजान' चित्रपटाच्या सीक्वलची वाट पाहत होते. 'पवनपुत्र भाईजान' या चित्रपटाच्या सीक्वलची माहिती समोर आल्यावर चाहत्यांना खूप आनंद झाला. आता 'पवनपुत्र भाईजान' या चित्रपटाची नवीन अपडेट समोर आली आहे. 'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, 'पवनपुत्र भाईजान' चित्रपटात करीना कपूरच्या जागी पूजा हेगडे दिसणार आहे. 'पवनपुत्र भाईजान' या चित्रपटात पूजा हेगडे हीच भूमिका साकारणार आहे जी करीना कपूरने 'बजरंगी भाईजान' चित्रपटात साकारली होती. अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

विशेष म्हणजे 'बजरंगी भाईजान' या चित्रपटात मुन्नी (हर्षाली मल्होत्रा) या मूक पाकिस्तानी मुलीची कथा दाखवण्यात आली होती. ती तिच्या आईसोबत भारतात येते आणि तिच्यापासून विभक्त होते. त्यानंतर, बजरंगी (सलमान खान) मुन्नीला भेटतो आणि तिला पाकिस्तानमध्ये तिच्या आईला भेटवण्यासाठी प्रयत्न करतो. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने पाकिस्तानी पत्रकार चांद नवाब यांची भूमिका साकारली होती. 'बजरंगी भाईजान' चित्रपट पाहून लोक खूप भावुक झाले होते.

Web Title: Kareena Kapoor's address cut from Salman Khan's 'Pawan Putra Bhaijaan', South actress' entry in the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.