'गोलमाल अगेन'मध्ये करिना कपूर करणार नाही कॅमिओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 14:51 IST2017-08-11T06:16:45+5:302017-08-15T14:51:30+5:30

 अजय देवगण आणि रोहित शेट्टी सध्या गोलमाल अगेनच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांना घेऊन चर्चेत आहे.या चित्रपटात ...

Kareena Kapoor will not make a gamble again! | 'गोलमाल अगेन'मध्ये करिना कपूर करणार नाही कॅमिओ!

'गोलमाल अगेन'मध्ये करिना कपूर करणार नाही कॅमिओ!

 
जय देवगण आणि रोहित शेट्टी सध्या गोलमाल अगेनच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांना घेऊन चर्चेत आहे.या चित्रपटात करिना कपूर खान कॅमिओ करणार असल्याची चर्चा होती. कारण गोलमाल आणि करिना असे एक वेगळेच नाते आहे. त्यामुळे गोलमाल अगेनमध्ये ही करिना दिसणार असल्याचे समजले होते. मात्र मीडियाशी बोलताना या बातमीत तथ्य नसल्याचे चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टीने सांगितले.  

रोहित पुढे म्हणाले की "तुम्हला मिळालेली बातमी चुकीची आहे. मला करीना कपूर बरोबर पूर्ण चित्रपट करू इच्छितो. या  चित्रपटासाठी आम्ही परिणीतीला कास्ट केले आहे आणि तिला का कास्ट केले हे जर मी तुम्हाला सांगितले तर या चित्रपटाची पूर्ण कथा तुम्हाला समजून जाईल.''

या चित्रपटात अजय देवगणबरोबर अर्शद वारसी, तुषार कपूर, निल नितीन मुकेश, तब्बू, कुणाल खेमु, श्रेयस तळपदे हे कलाकार झळकणार आहे. परिणीती चोप्रा आणि तब्बू पहिल्यांदा गोलमालच्या सीरिजमध्ये काम करते आहे. नुकतेच हैदराबादमध्ये जाऊऩ या चित्रपटाचे टायटल साँग शूट करण्यात आले. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम तिथे उपस्थित होती. हा चित्रपट दिवाळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच वेळेला अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा ‘2.0’ आणि आमिर खानचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा तिसरा चित्रपट ही रिलीज होणार आहे. त्यामुळे दिवाळीत बॉक्स ऑफिसवर एकच घमासान बघयाला मिळणार आहे.  

ALSO READ : ​'गोलमाल 4' नंतर अजय देवगण आणि रोहित शेट्टी तयार करणार 'सिंघम 3'

Web Title: Kareena Kapoor will not make a gamble again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.