करिना कपूरचा खुलासा; धोनी नव्हे तर ‘या’ क्रिकेटपटूला खेळताना बघून येते प्रेम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 21:02 IST2017-09-21T15:32:59+5:302017-09-21T21:02:59+5:30

महेंद्रसिंग धोनी नव्हे तर या खेळाडूला खेळताना बघून त्याच्यावर प्रेम येते, असा खुलासा करिना कपूर-खानने केला. कोण असेल बरं हा क्रिकेटपटू?

Kareena Kapoor reveals; Not only Dhoni, but the 'cricketer' is seen playing love! | करिना कपूरचा खुलासा; धोनी नव्हे तर ‘या’ क्रिकेटपटूला खेळताना बघून येते प्रेम!

करिना कपूरचा खुलासा; धोनी नव्हे तर ‘या’ क्रिकेटपटूला खेळताना बघून येते प्रेम!

रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर-खान हिने आज (दि.२१) तिचा वाढदिवस साजरा केला आहे. पतौडी खानदानची सून असलेल्या करिनाने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलाला जन्म दिला. ज्याचे नाव तैमूर ठेवले असून, तो सगळ्यांचाच लाडका बनला आहे. करिनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की, तिचा आवडता क्रिकेटपटू कोण आहे. करिनाने म्हटले की, विराट कोहलीला खेळताना बघून त्याच्यावर खूपच प्रेम येते. तो माझा आवडता खेळाडू आहे. यावेळी करिनाने विराटची तुलना चक्क क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाºया सचिन तेंडुलकरशी केली. 

करिनाच्या क्रिकेट प्रेमाचा अंदाज यावरून लावण्यात आला की, तिचा पती सैफ अली खान याने आयपीएलमध्ये टीम खरेदी करण्यासाठी बोली लावली होती. या व्यतिरिक्त प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मन्सूर अली खान यांची करिना सून आहे. ज्यांनी आपल्या करिअरमध्ये ४६ टेस्ट मॅचमध्ये ४० वेळा कर्णधारपद भुषविले. 



असो, कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आॅस्ट्रेलियासारख्या दमदार संघासोबत पाच मॅचेसची वनडे सीरिज खेळत आहे. विराटचा फॉर्म पाहता त्याचा संघ आॅस्ट्रेलिया संघाला धूळ चारेल असेच काहीसे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री दिशा पटानीने म्हटले होते की, तिला विराट कोहलीला डेट करण्याची इच्छा आहे. विराटचा मैदानाबरोबर ग्लॅमरचा दुनियेतही जबरदस्त जलवा आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबरचे त्याचे अफेअर नेहमीच चर्चिला जातात. 



असो, करिना कपूरच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास, ती ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रेग्नेंसीनंतर करिना या चित्रपटातून कमबॅक करीत आहे. तैमूरच्या जन्मानंतर करिनाचे वजन खूपच वाढले होते, परंतु तिने गेल्या काही दिवसांमध्ये खूप वजन घटविले आहे. 

Web Title: Kareena Kapoor reveals; Not only Dhoni, but the 'cricketer' is seen playing love!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.