करिना कपूरने शाहरुख खानसोबत काम करण्यास दिला नकार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2017 16:01 IST2017-06-28T10:07:26+5:302017-06-28T16:01:08+5:30
बॉलिवूडमध्ये किंग खानसोबत काम करण्याची प्रत्येक अभिनेत्री इच्छा असते. पण या सगळ्यात एक अशी अभिनेत्री आहे जिने शाहरुख सोबत ...

करिना कपूरने शाहरुख खानसोबत काम करण्यास दिला नकार ?
ब लिवूडमध्ये किंग खानसोबत काम करण्याची प्रत्येक अभिनेत्री इच्छा असते. पण या सगळ्यात एक अशी अभिनेत्री आहे जिने शाहरुख सोबत काम करण्यास नकार दिला आहे. करिन कपूरने शाहरुख खानसोबत काम करण्यास नकार दिला आहे. शाहरुख दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुखच्या अपोझिट रोलसाठी आनंद एल राय यांना करिना कपूरला घेण्याची इच्छा होती. यासाठी करिनाला विचारण्यात आले मात्र तिने शाहरुखसोबत काम करण्यास नकार दिल्याचे समजते आहे. गेल्या काही दिवसांपासून शाहरुखचा हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. मात्र करिनाने या चित्रपटाचे भाग बनण्यापासून नकार दिला. करिनाने आपण रिहा कपूरच्या ‘वीरे दी वेडिंग’चित्रपटात बिझी आहोत. त्यामुळे आनंद एल राय यांच्या चित्रपटांच्या तारखांमध्ये क्लैशस होत असल्याचे ती म्हणाली. याच कारणामुळे आपण त्यांना नकार दिल्याचे करिनाचे म्हणणे आहे. करिनाने नकार दिल्यानंतर दिग्दर्शक शाहरुखला सूट होईल अशा अभिनेत्रीच्या शोधात होते. त्यांचा हा शोध कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मावर येऊन संपला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्माला या चित्रपटासाठी साईऩ करण्यात आले आहे.
वीरे दी वेडिंग चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करिना प्रेग्नेंट होती त्यामुळे ती सुट्टीवर गेली त्यामुळे या चित्रपटाच्या शूटिंगला उशीर झाला आहे. यात तिच्यासह सोनम कपूर आणि स्वरा भास्करसुद्धा दिसणार आहे.
वीरे दी वेडिंग चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करिना प्रेग्नेंट होती त्यामुळे ती सुट्टीवर गेली त्यामुळे या चित्रपटाच्या शूटिंगला उशीर झाला आहे. यात तिच्यासह सोनम कपूर आणि स्वरा भास्करसुद्धा दिसणार आहे.