करीना कपूरला आता साकारायचीय 'ही' भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 20:08 IST2019-08-26T20:07:42+5:302019-08-26T20:08:04+5:30
करीना लवकरच 'गुड न्यूज' चित्रपटात झळकणार आहे.

करीना कपूरला आता साकारायचीय 'ही' भूमिका
बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूरला बॉलिवूडमध्ये २० वर्षे पूर्ण होण्यासाठी फक्त १ वर्षच बाकी आहे आणि आता करीनाला वाटतंय की ती निगेटिव्ह भूमिका साकारण्यासाठी तयार आहे. करीनाने तिच्या कारकीर्दीत पहिल्यांदा निगेटिव्ह भूमिका २००४ साली फिदा चित्रपटात साकारली होती. या चित्रपटात करीनाचा केमिओ होता.
फिदा चित्रपटात करीनाने अशा महिलेची भूमिका साकारली होती जी एका व्यक्तीला त्याच्या प्रेयसीच्या चुकीची शिक्षा देते. या चित्रपटात करीनासोबत शाहिद कपूर व फरदीन खान मुख्य भूमिकेत होते. करीनाने हिरॉईन चित्रपटातही निगेटिव्ह भूमिका चांगल्याप्रकारे साकारल्या होत्या.
लॅक्मे फॅशन वीक २०१९मध्ये पीटीआयशी बोलताना करीना कपूरने सांगितलं की, जर भूमिका चांगली असेल तर निगेटिव्ह भूमिका साकारण्याची इच्छा आहे.
गुड न्यूज चित्रपटाबद्दल करीनाने सांगितलं की, हा चित्रपट एण्टरटेनिंग आहे. करीना म्हणाली की, मला वाटतं की मजेशीर व उत्साही सिनेमा आहे. कारण हा चित्रपट ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे कॉन्सेप्ट खूप वेगळं आहे आणि हा चित्रपट सुट्ट्यांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहून प्रेक्षक खूप हसतील.
गुड न्यूज चित्रपटात एका जोडप्याची कथा रेखाटण्यात आली आहे जे प्रेग्नेंट होण्यासाठी प्रयत्न करत असतात.
या चित्रपटात करीनाशिवाय दिलजीत दोसांझ, कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट २७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.