करीना कपूरच्या फोटोंची चर्चा, मोनोकिनीत दिसला बेबोचा बेबी बंप? चाहत्यांना वाटतंय अभिनेत्री पुन्हा गरोदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 11:35 IST2025-07-09T11:35:02+5:302025-07-09T11:35:54+5:30
करीना पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. करीनाच्या व्हॅकेशन फोटोंमुळे ४४व्या वर्षी अभिनेत्री तिसऱ्यांदा आई होणार असल्याचं बोललं जात आहे.

करीना कपूरच्या फोटोंची चर्चा, मोनोकिनीत दिसला बेबोचा बेबी बंप? चाहत्यांना वाटतंय अभिनेत्री पुन्हा गरोदर
बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान पटौडी कुटुंबाची सून आहे. करीनाने सैफ अली खानसोबत लग्न करत संसार थाटला. त्यांना तैमुर आणि जेह ही दोन मुलंदेखील आहेत. आता करीना पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. करीनाच्या व्हॅकेशन फोटोंमुळे ४४व्या वर्षी अभिनेत्री तिसऱ्यांदा आई होणार असल्याचं बोललं जात आहे.
करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हॅकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये बीचच्या शेजारी ती मोनोकिनीत दिसत आहे. पण, करीनाच्या या फोटोंनी वेगळीच चर्चा रंगली आहे. या फोटोंमध्ये चाहत्यांना बेबोचा बेबी बंप दिसला आहे. त्यामुळे करीना तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. बेबोच्या या फोटोंवर अनेकांनी तशा कमेंटही केल्या आहेत. "ती प्रेग्नंट वाटत आहे", "ही गरोदर आहे का?" अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, करीना कपूर आणि सैफ अली खान हे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. २०१२ मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. त्यांना तैमुर आणि जेह ही दोन मुलं आहे. करीना आणि सैफची दोन्ही मुलं ही लोकप्रिय स्टारकिड आहेत. पण, आता मात्र पतौडींच्या तिसऱ्या वारसदाराची चर्चा रंगली आहे.