​कमी शिकल्याचा करिना कपूरला होतो पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2016 11:33 IST2016-12-18T11:28:55+5:302016-12-18T11:33:59+5:30

लवकरच आई होणाऱ्या करिना कपूरला एका गोष्टीचा खूप पश्चाताप होतो. आता तुम्ही म्हणाल की, मातृत्त्वाचा आनंद लुटणाऱ्या बेबोला कोणता ...

Kareena Kapoor is less learned and remorse | ​कमी शिकल्याचा करिना कपूरला होतो पश्चाताप

​कमी शिकल्याचा करिना कपूरला होतो पश्चाताप

करच आई होणाऱ्या करिना कपूरला एका गोष्टीचा खूप पश्चाताप होतो. आता तुम्ही म्हणाल की, मातृत्त्वाचा आनंद लुटणाऱ्या बेबोला कोणता पश्चाताप असेल? सगळेच तर आहे तिच्यापाशी. अहो पण तिला असे नाही वाटत.

फार कमी वयातच मोठ्या पडद्यावर झळकल्यामुळे तिचे शिक्षण अर्धवटच राहिले. शाळा कॉलेजमध्ये असतानासुद्धा तिची शिकण्यामध्ये फार विशेष अशी रुची नव्हती. मोठी बहीण करिश्मा कपूरच्या चित्रपटांच्या सेटवर तिला वेळ घालवायला आवडायचे. परंतु आता तिला या सर्व गोष्टींचा खूप पश्चाताप वाटतो.

ती म्हणते, ‘मी शाळा-कॉलेज फार गांभीर्याने कधी केलेच नाही. सतत करिश्मासोबत तिच्या शूटींगवर जायचे. पण आता मला माझ्या कमी शिकण्याचा खूप पश्चाताप होतो. सैफ आणि त्याचे सर्व मित्र फार उच्चशिक्षित आहे. त्याच्या फॅमिलीतील सदस्यसुद्धा नामांकित युनिव्हर्सिटीजचे विद्यार्थी राहिलेले आहेत. याउलट माझ्या घरी एकदम फिल्मी वातावरण होते. शिक्षण आमच्यासाठी टॉप प्रियॉरिटी नव्हते.’

करिनाने वयाच्या केवळ २० व्या वर्षी जे. पी. दत्ता यांच्या ‘रेफ्युजी’ चित्रपटातून पदार्पण केले होते. लहानपणापासून ग्लॅमरच्या दुनियेत वाढलेल्या बेबोला त्याकाळी शिक्षणाचे फारसे महत्त्व वाटत नसे. पण आता ती जेव्हा सैफच्या मित्रांना भेटते, ज्यांपैकी बरेच जण ऱ्होडस् स्कॉलर, केंम्ब्रिज, आॅक्सफोर्ड, विंचेस्टरसारख्या विद्यापीठाचे पदवीधर आहेत, तेव्हा तिला कमी शिक्षित असल्याची खंत वाटते. होणाऱ्या बाळाच्या बाबतीत मात्र असे होऊ द्यायचे नाही, असे तिने ठरवले आहे.

‘आमच्या होणाऱ्या बाळाच्या शिक्षणाबाबत मी कोणत्याच प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही. सैफसुद्धा मुलांच्या शिक्षणासाठी खूप आग्रही आहे. सारा आणि इब्राहिमच्या शैक्षणिक प्रगतीवर तो कायम नजर ठेवून असतो’, असे ती म्हणाली. करिनाला फिरायला, नव्या लोकांना भेटायला, काही तरी नवीन करायला खूप आवडते. २० डिसेंबर किंवा आसपासची तारीख तिची ड्यू डेट आहे.

Web Title: Kareena Kapoor is less learned and remorse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.