दिवाळी सेलिब्रेशनच्या फोटोंमध्ये स्पष्ट दिसले करिना कपूरचे बेबी बम्प, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नन्सीचा ग्लो

By गीतांजली | Updated: November 11, 2020 14:20 IST2020-11-11T14:00:08+5:302020-11-11T14:20:37+5:30

करिना कपूर खान आई बबिता कपूर आणि तिच्या टीमसोबत दिवाळीचे छोटेसे सेलिब्रेशन करताना दिसली.

kareena kapoor khan seen with baby bump in diwali celebration photos with mom babita kapoor | दिवाळी सेलिब्रेशनच्या फोटोंमध्ये स्पष्ट दिसले करिना कपूरचे बेबी बम्प, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नन्सीचा ग्लो

दिवाळी सेलिब्रेशनच्या फोटोंमध्ये स्पष्ट दिसले करिना कपूरचे बेबी बम्प, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नन्सीचा ग्लो

करिना कपूर खान आई बबिता कपूर आणि तिच्या टीमसोबत दिवाळीचे छोटेसे सेलिब्रेशन करताना दिसली. करिनाची मॅनेजर पूनम दमानियाने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.  या फोटोंमध्ये करिना कपूर आई बबिता, पूनम, फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता आणि मेकअप आर्टिस्ट पॉम्पी दिसतो आहे. करिनाने यात ऑफ-व्हाइट रंगाचा सलवार-कुर्ता परिधान करत त्यावर लाल रंगाची ओढणी घेतली आहे. बेबोच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंन्सीचा ग्लो स्पष्ट दिसतोय. करिनाचा बेबी बम्पसुद्धा दिसतोय. करिनाचा प्रेग्नेंसीचा सहावा महिना सुरु आहे. या दरम्यान घरी आराम करण्याऐवजी ती कामात बिझी आहे. काही दिवसांपूर्वी ती आगामी चित्रपट लाल सिंग चड्ढाचे शूटिंग पूर्ण करून मुंबईला परतली आहे. मुंबईत आल्यानंतर तिने एका जाहिरातीचे शूटिंगदेखील केली आहे.

रखडला ‘वीरे दी वेडिंग’चा सीक्वल
 करिना कपूरच्या प्रेग्नंसीमुळे ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमाचा सीक्वल मात्र रखडला आहे. ‘वीरे दी वेडिंग’चा दुसरा पार्ट बनवण्याची तयारी सुरु झाली असतानाच करिना प्रेग्नंट राहिली. यामुळे निर्माता निखील द्विवेदी यांनी शूटींगचा बेत रद्द केला. आता करिनाची प्रसूती झाल्यानंतर या सिनेमावर पुन्हा काम सुरु होईल.


पुन्हा ही गोष्ट करायची नाही
 अलीकडेच एका मुलाखतीत बेबो तिच्या दुस-या प्रेग्नंसीवर बोलताना दिसली होती. अशी कोणती गोष्ट आहे, जी दुसऱ्या प्रेग्नंसीत तुला करायची नाही, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर मला खूप जास्त वजन वाढवायचे नाही, असे ती म्हणाली होती. तैमूरच्यावेळी प्रेग्नंट असताना मला सर्वांनी खूप खाण्याचा सल्ला दिला होता आणि मी नुसते खात सुटले होते. यामुळे माझे वजन 25 किलो वाढले होते. आता मला पुन्हा असे करायचे नाही. मला फक्त हेल्दी व फिट राहायचे आहे, असे ती म्हणाली होती.

 

Web Title: kareena kapoor khan seen with baby bump in diwali celebration photos with mom babita kapoor