गुपचूप उरलकला वरुण-नताशाने साखरपुडा, करिनाने केले Confirm
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 11:45 IST2020-12-18T11:44:20+5:302020-12-18T11:45:48+5:30
करीना कपूरच्या टॉक शोमध्ये वरुण धवनने नताशाबरोबरच्या लग्नाबद्दल सांगितले की, आम्ही गेल्या काही वर्षापासून एकत्र आहोत त्यामुळे लग्नही करणार मात्र अद्याप लग्नाची तारिख ठरलेली नाही.

गुपचूप उरलकला वरुण-नताशाने साखरपुडा, करिनाने केले Confirm
गेल्या काही दिवसांपासून वरुण- नताशा त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की वरुण आणि नताशने या वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबर अखेरपर्यंत लग्न करणार होते मात्र कोरोनामुळे त्यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली. मात्र या दरम्यान त्यांनी गुपचूप साखरपुडा उरकला असल्याचे माहिती समोर येत आहे.
मात्र यावर दोघांकडून यावर आतापर्यंत कोणतेही स्पष्टीकरण आलेले नसले तरी करिनासह बोलताना वरुणने नकळत नताशाला तिची मंगेतर म्हटले. मंगेतर हा शब्द ऐकताच करिनाला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण या दोघांचा साखरपुडा हा चाहत्यांप्रमाणेच सेलिब्रेटींसाठीही धक्काच असणार आहे. यावरून हे स्पष्ट झाले की वरुणने नताशाबरोबर गुपचूप साखरपुडा केला आहे. करिनानेही वरुणला लग्नाविषयी प्रश्न विचारला होता.
करीना कपूरच्या टॉक शोमध्ये वरुण धवनने नताशाबरोबरच्या लग्नाबद्दल सांगितले की, आम्ही गेल्या काही वर्षापासून एकत्र आहोत त्यामुळे लग्नही करणार मात्र अद्याप लग्नाची तारिख ठरलेली नाही. सध्या आमच्या लग्नाच्या चर्चा जोर धरत आहेत. मात्र योग्य वेळ येईल तेव्हा लग्नबंधनात अडकत आयुष्याची नवीन सुरूवात करू असे सांगितले. वरुण आणि नताशा बॉलिवूडमधले एक क्यूट कपल आहे. वरुण आणि नताशा एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत आहेत.
माहीप कपूरने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात नताशा दलाल लाल रंगाची साडी परिधान करुन दिसते आहे. नताशाचे अद्याप वरुण धवनशी लग्न झालेले नाही, परंतु अभिनेत्याच्या दीर्घायुष्यासाठी तिने करवा चौथचे व्रत केल्याचे म्हटले जातंय. सोशल मीडियावर नताशा दलालचा हा फोटो खूप व्हायरल होतो आहे. नताशा यात खूपच सुंदर दिसली होती.
या खास प्रसंगी संजय कपूरची पत्नी माहीप कपूर, डेव्हिड धवनची पत्नी लली आणि चंकी पांडेची पत्नी भावना दिसली. याशिवाय शिल्पा शेट्टी, कृष्णा लुल्ला, नीलम कोठारी आणि इतर सेलेब्रिटीसुद्धा सुनीताच्या घरी दिसल्या, पण सर्वाचे लक्ष वेधून घेतले ते वरुण धवनची गर्लफ्रेंड नताशा दलालने.