करणशी लग्न अन् सलमानसोबत हनीमून!!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 19:56 IST2016-05-01T14:26:31+5:302016-05-01T19:56:31+5:30
बिपाशा बसू आणि करण जोहर अखेर लग्नबंधनात अडकले. दोघांनाचेही अभिनंदन करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज जोडप्याच्या रिसेप्शनला पोहोचले. यात सुपरस्टार सलमान खान याचाही समावेश होता.. याचदरम्यान एका पत्रकारांने बिपाशाला हनीमूनबाबत विचारले. यावर बिप्स जोरदार हसली...करणला डिवचायचेच, असेच जणू तिने ठरवले असणार...तिने काय उत्तर दिले, माहितीय??? हनीमूनसाठी मला सलमानसोबत जायला आवडेल..असे ती म्हणाली...

करणशी लग्न अन् सलमानसोबत हनीमून!!!
ब पाशा बसू आणि करण जोहर अखेर लग्नबंधनात अडकले. दोघांनाचेही अभिनंदन करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज जोडप्याच्या रिसेप्शनला पोहोचले. यात सुपरस्टार सलमान खान याचाही समावेश होता. यावेळी बिप्स व करणने सलमानसोबत एक मस्तपैकी पोझही छायाचित्रकारांना दिली. याचदरम्यान एका पत्रकारांने बिपाशाला हनीमूनबाबत विचारले. यावर बिप्स जोरदार हसली...करणला डिवचायचेच, असेच जणू तिने ठरवले असणार...तिने काय उत्तर दिले, माहितीय??? हनीमूनसाठी मला सलमानसोबत जायला आवडेल..असे ती म्हणाली...तिच्या या उत्तराने एकच हशा पिकला. सलमानलाही हसू आवरले नाही. मग काय, सल्लूमियाँही मागे राहणाºयापैकी थोडाच आहे. गमती गमतीत त्यानेही बिपाशाच्या पतीराजांची गुगली केली. बिपाशा व करणच्या जोडीबद्दल तुला काय वाटते, असा प्रश्न सलमानला पत्रकारांनी विचारला. यावर सलमान क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले. जोडी तर चांगलीच आहे आणि ही जोडी टिकावी,अशी मी अपेक्षा करतो. जोडी टिकणे महत्त्वाचे आहे...असे सलमान म्हणाला. बिपाशाचे हे पहिले लग्न आहे. पण करणचे तिसरे लग्न आहे...हे तुम्ही जाणताच. अशास्थितीत सलमानचा हा टोला करणच्या नक्कीच जिव्हारी लागला असावा...