OMG! करण जोहर बनला ‘बॉबी’! विश्वास बसत नसेल तर पाहा, ‘फेस मॅपिंगची जादू’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 05:50 PM2020-04-28T17:50:32+5:302020-04-28T17:52:39+5:30

कृपया हसा. तुम्हाला हसण्याची परवानगी आहे...

karan johar replaces rishi kapoor in iconic bobby song with face mapping-ram | OMG! करण जोहर बनला ‘बॉबी’! विश्वास बसत नसेल तर पाहा, ‘फेस मॅपिंगची जादू’

OMG! करण जोहर बनला ‘बॉबी’! विश्वास बसत नसेल तर पाहा, ‘फेस मॅपिंगची जादू’

googlenewsNext
ठळक मुद्दे1973 मध्ये ‘बॉबी’  हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 

लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूडचे सेलिब्रिटी कुठे बिझी आहेत, याचे उत्तर एकच़ ते म्हणजे सोशल मीडियावर. होय, बॉलिवूडचे सगळेच सेलिब्रिटी सध्या सोशल मीडियावर वेळ घालवत आहेत. कुणी फिटनेस व्हिडीओ शेअर करताहेत, कुणी रेसीपी तर कुणी आणखी काही. बॉलिवूडचा दिग्गज निर्माता व दिग्दर्शक करण जोहर हाही याला अपवाद नाही.  आपल्या मुलांबरोबरचे फनी व्हिडिओ शेअर करत करण सध्या लोकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. याचा एक भाग म्हणून करणने अलीकडे ‘लॉकडाऊन विथ जोहर्स’ ही सीरिज सोशल मीडियावर आणली होती. आता या सीरिजनंतर करण  एक नवीन व्हिडिओ घेऊन आला आहे, ज्यात तो फेस मॅपिंगच्या मदतीने ‘बॉबी’ बनला आहे. होय, ‘बॉबी’ या चित्रपटात ऋषी कपूर आहेत. पण या व्हिडीओत चक्क ‘बॉबी’मधील गाण्यात करण जोहर दिसतोय. तो सुद्धा हुबेहुब बॉबीसारखा. हा व्हिडिओ करणच्या एका चाहत्याने तयार केला आणि करणने तो शेअर केला आहे.

 इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या व्हिडीओ ‘मैं शायर तो नहीं’ या गाण्यात करण अ‍ॅक्टिंग करताना दिसतोय. प्रत्यक्षात हे मॅपिंग तंत्राचा वापर करून केले गेले आहे.  

‘फेस मॅपिंगची जादू. राज कपूर नेहमीच माझे आवडते चित्रपट निर्माते आहेत आणि माझे आवडते अभिनेते ऋषी कपूर. हा व्हिडीओ मला संदीपने भेट म्हणून दिला आहे. याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. मला तुमच्या सर्वांना सांगायचे आहे की कृपया हे पाहून हसा. तुम्हाला हसण्याची परवानगी आहे,’ असे हा व्हिडीओ शेअर करताना करणने लिहिले आहे.
1973 मध्ये ‘बॉबी’  हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात डिंपल कपाडियासोबत ऋषी कपूर  मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट सुपरडुपी हिट ठरला होता.

Web Title: karan johar replaces rishi kapoor in iconic bobby song with face mapping-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.