प्रतीक्षा संपली! 'Mr and Mrs Mahi' मे महिन्यात प्रदर्शित होणार, सिनेमाची रिलीज डेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 10:59 AM2024-04-14T10:59:25+5:302024-04-14T10:59:46+5:30

'मिस्टर अँड मिसेस माही' रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. मे महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

karan johar mr and mrs mahi movie release date announced film will hit theatres in may | प्रतीक्षा संपली! 'Mr and Mrs Mahi' मे महिन्यात प्रदर्शित होणार, सिनेमाची रिलीज डेट समोर

प्रतीक्षा संपली! 'Mr and Mrs Mahi' मे महिन्यात प्रदर्शित होणार, सिनेमाची रिलीज डेट समोर

सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचं राज्य असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतेच दोन बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. स्पोर्ट्स ड्रामा असलेला 'मैदान' सिनेमा ११ एप्रिलला प्रदर्शित करण्यात आला. मैदाननंतर आता आणखी एक स्पोर्ट ड्रामा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बहुचर्चित असलेल्या 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. पण, या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात येत होती. अखेर 'मिस्टर अँड मिसेस माही'ला मुहुर्त मिळाला असून लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाची निर्मिती केली आहे. करणने पोस्ट शेअर करत या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ३१ मे २०२४ रोजी 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. दोन वर्षांपूर्वीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. आधी १९ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. पण, आता ३१ मे रोजी 'मिस्टर अँड मिसेस माही' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

"काही चित्रपट हे स्टोरीपेक्षा अधिक असतात...प्रेक्षकांना ते त्यांच्या स्वप्नांविषयी सांगतात...'मिस्टर अँड मिसेस माही' हा सिनेमा आमच्या जवळचा आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत आहोत. ३१ मे २०२४! तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!!", असं या पोस्टमध्ये करणने म्हटलं आहे. 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमा भारताचा माजी कर्णधार आणि उत्कृष्ट क्रिकेटर असलेल्या महेंद्रसिंग धोनीवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. 

'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमात राजकुमार राव आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात राजकुमार महेंद्र तर जान्हवी महिमा या भूमिका साकारताना दिसणार आहेत. शरण शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

Web Title: karan johar mr and mrs mahi movie release date announced film will hit theatres in may

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.