करण जोहरसोबत काम करण्याच्या प्रश्नावर अखेर बोलली काजल...वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 17:00 IST2017-07-27T11:21:31+5:302017-07-27T17:00:18+5:30
करण जोहर आणि काजलची मैत्री जगजाहीर होती. गेल्या वर्षी त्यांची मैत्रित फुट पडली आहे.करण जोहरच्या ऑटोबायोग्राफी 'द अनसुटेबल ब्वॉयमध्ये' ...

करण जोहरसोबत काम करण्याच्या प्रश्नावर अखेर बोलली काजल...वाचा सविस्तर
क ण जोहर आणि काजलची मैत्री जगजाहीर होती. गेल्या वर्षी त्यांची मैत्रित फुट पडली आहे.करण जोहरच्या ऑटोबायोग्राफी 'द अनसुटेबल ब्वॉयमध्ये' त्यांने या गोष्टीचा उल्लेख केला आहे. आतापर्यंत काजलने करण सोबत भविष्यात काम करणार की नाही या प्रश्नावर उत्तर देणे टाळले होते. मात्र पीटीआयने काजलाला पुन्हा एकदा याच संदर्भात प्रश्न विचारले की तू भविष्यात करणसोबत काम करणार का? यावर आधी ती म्हणाली, '' मी या प्रश्नाचे उत्तर देणार नाही मात्र नंतर ती, म्हणाली ''माझ्या जर आणखीन एखाद्या दुसऱ्या मित्राने मला चित्रपटाची ऑफर देईल तर मी 100 टक्के काम करायला तयार होईन. मात्र मी करणसोबत काम करणार नाही.'' पुढे जाऊन ती म्हणाली ''जर तुम्ही कोणासोबत बोलत नसाल तर तुम्ही त्या व्यक्तीसोबत काम सुद्धा करु शकत नाही.'' काजलच्या म्हणण्यानुसार एकत्र काम करायला तुमचा त्या व्यक्तिशी संवाद असणे गरजेचा असते. करण आणि काजलची मैत्री हे सगळ्यांच माहिती आहे करणने जेव्हा दिग्दर्शनात पदार्पण केले होते. तेव्हा 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात त्यांने काजलला मुख्य भूमिका दिली होती. काजल आणि करणची मैत्री 25 वर्षं जुनी होती. करण काजलला आपला लकी चार्म मानायचा.गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा 'शिवाय' आणि करणच्या 'ए दिल है मुश्किल'मध्ये क्लैशेस झाले होते. त्यावेळी कमाल आर खानने ए दिल है मुश्किलच्या मेकर्सने आपल्याला शिवायबाबत वाईट लिहिण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप लावला होता. त्यानंतर अजय देवगण आणि करण जोहरमध्ये एक नवा वाद उभा राहिला होता.