मेरे ख्वाबों में जो आए... वर थिरकला करण जोहर, व्हिडीओ पाहून हसून हसून व्हाल लोटपोट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 05:50 PM2020-09-02T17:50:40+5:302020-09-02T18:10:27+5:30

या फनी व्हिडीओ युजर्स एकापेक्षा एक मजेदार कमेंट करत आहेत.

karan johar dancing on kajol song mere khwabon mein jo aaye | मेरे ख्वाबों में जो आए... वर थिरकला करण जोहर, व्हिडीओ पाहून हसून हसून व्हाल लोटपोट

मेरे ख्वाबों में जो आए... वर थिरकला करण जोहर, व्हिडीओ पाहून हसून हसून व्हाल लोटपोट

googlenewsNext
ठळक मुद्देसुशांतच्या मृत्यूनंतर करण  मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. या ट्रोलिंगला कंटाळून करणने सोशल मीडियावर पोस्ट करणे बंद केले होते.

करण जोहर सध्या जाम चर्चेत आहे. एकतर सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगमुळे आणि दुसरे म्हणजे, तो लिहिणार असलेल्या पुस्तकामुळे. लवकरच करण जोहर आपल्या मुलांवर एक पुस्तक लिहिणार आहे. तिसरे कारण सांगायचे तर त्याचा एक व्हिडीओ. होय, सध्या करण जोहरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत करण ‘मेरे ख्वाबों में जो आए’ या गाण्यावर डान्स करताना दिसतोय. अर्थात हा व्हिडीओ फोटोशॉप्ड आहे.
व्हिडीओत काजोलच्या जागी करण जोहरचा चेहरा लागलेला आहे. या फनी व्हिडीओ युजर्स एकापेक्षा एक मजेदार कमेंट करत आहेत. व्हिडीओ इतक्याच या कमेंटही मजेदार आहेत.

सुशांतच्या मृत्यूनंतर करण  मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. या ट्रोलिंगला कंटाळून करणने सोशल मीडियावर पोस्ट करणे बंद केले होते. सतत होणा-या ट्रोलिंगचा करणला प्रचंड मानसिक त्रास होत होत असल्याचे आणि तो दिवसरात्र रडत असल्याचेही त्याच्या एका मित्राने सांगितले होते.
सुशांत सिंग राजपूतच्या स्मरणार्थ करण जोहरने एक पोस्ट शेअर केली होती. मात्र त्याची ही पोस्ट सुशांतच्या फॅन्सना आवडली नव्हती आणि त्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली होती. त्यातच कंगना राणौत करण जोहरवर बरसली होती. यानंतर करणवर चारही बाजूने टीकेची झोड उठली होती. सतत होणा-या ट्रोलिंगमुळे करण जोहर सोशल मीडियावरुन गायब झाला होता. आधी त्याने ट्विटरवर वरुन अनेकांना अनफॉलो केले. त्यानंतर पोस्ट करणे देखील थांबवले होते. मात्र अलीकडे स्वातंत्र्य दिनानिमित्त पोस्ट करत करण जोहर पुन्हा सोशल मीडियावर अ?ॅक्टिव्ह झाला आहे.

Web Title: karan johar dancing on kajol song mere khwabon mein jo aaye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.