करण जोहर यासाठीच पुरस्कार सोहळ्यात जातो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 20:02 IST2016-12-24T20:02:11+5:302016-12-24T20:02:11+5:30
बॉलिवूडमधील आघाडीच्या निर्माता व दिग्दशर्कांत सामील असलेला करण जोहर याने अफलातून खुलासा केला आहे. म्हणे तो केवळ पुरस्कार मिळत ...

करण जोहर यासाठीच पुरस्कार सोहळ्यात जातो!
आमिर खानने काही वर्षांपासून पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहत नाही. यामुळे त्याची टीका केली जाते. तर काही स्टार अशा पुरस्कार सोहळ्यांना वारंवार उपस्थित राहत असेल तर त्यांच्याकडे काम नाही असे समजले जाते. या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडच्या काही कलाकारांनी पुरस्कार सोहळ्याच्या विरोधी सूर लावला आहे. यावर करण जोहरने आपले मत व्यक्त केले आहे. करण म्हणाला. ‘आमच्या इंडस्ट्रीमध्ये मुठभर लोकांनी पुरस्कार सोहळ्याला विरोध केला आहे. आमिर खान आणि कंगना रानावत सारखे कलाकार पुरस्कार सोहळ्यांना हजर राहत नाहीत.’ असा टोला त्याने लगावला.
करणने धक्कादायक विधान करीत ‘मी याबाबत कोणतीच भूमिका घेत नाही कारण मी पुरस्कार सोहळ्यांना एक तर पुरस्कार घ्यायला जातो नाहीतर संचालनातून मिळणाºया पैशांसाठी जातो. फिल्मफेअरला हजर राहण्याचे कारण मी इतिहासाचा एक भाग आहे. असे मत त्याने नोंदविले. बॉलिवूडच्या काही स्टार्सना पुरस्कार मिळत नसल्याने ते निराश होतात व परिणामी पुरस्कार सोहळ्यावर उपस्थित न लावता आपला राग व्यक्त करतात.
करण पुढे म्हणाला, काही पुरस्कार सोहळ्यांची वैधता आणि अखंडता याबद्दल शंका घेतली जाते. परंतु लोकांना असे कार्यक्रम पाहायला आवडतात. अनेक लोक टीव्ही चॅनल्सवर हे सोहळे पाहतात. आता भारतात चॅनल्सची संख्याही खूप मोठी आहे. यामुळे अशे पुरस्कार सोहळे टीव्हीवर दाखवून टीआरपी मिलविला जातो. लोकांना बॉलिवूड स्टार्सना आपल्या टीव्हीवर सिनेमाहून वेगळ्या पद्धतीने पहायचे असते.
करण जोहर याने अनेक बॉलिवूड पुरस्कार सोहळ्यांचे संचालन केले आहे. टीव्हीवर त्याचा ‘कॉफी विद करण’ हा शो चांगलाच प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमधील आघाडीचा निर्माता असल्याने त्याच्या शोला बहुतेक स्टार्स आवर्जून हजेरी लावतात.