केआरके पुन्हा बरळला म्हणे करिना कपूर आणि मी चार वर्ष रिलेशनशीपमध्ये होतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 17:29 IST2017-10-16T11:59:16+5:302017-10-16T17:29:16+5:30

कमाल रशीद खान आणि कोन्ट्रॉव्हर्सी असे समीकरणच जणू बनले आहे. नेहमीच वादग्रस्त ट्वीट करुन केआरके चर्चचा विषय बनतो. बॉलिवूडच्या ...

KARAKO and I have been in a four-year relationship | केआरके पुन्हा बरळला म्हणे करिना कपूर आणि मी चार वर्ष रिलेशनशीपमध्ये होतो

केआरके पुन्हा बरळला म्हणे करिना कपूर आणि मी चार वर्ष रिलेशनशीपमध्ये होतो

ाल रशीद खान आणि कोन्ट्रॉव्हर्सी असे समीकरणच जणू बनले आहे. नेहमीच वादग्रस्त ट्वीट करुन केआरके चर्चचा विषय बनतो. बॉलिवूडच्या प्रत्येक गोष्टीवर तो आपले मतं मांडतो. कमाल खान स्वत: ला बॉलिवूडचा स्वयंघोषित क्रिटिक्स म्हणवतो. यावेळी केआरकेने करिना कपूरसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि करिना आपल्यासोबत 4 वर्ष रिलेशनशीपमध्ये होती.  माझ्याकडे सध्या ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी पुरावा म्हणून फक्त हा फोटोच आहे. केआरकेने या ट्विटमध्ये कंगना रणौत आणि रंगोलीच्या नावाचे हॅशटॅगही जोडले. त्याच्या या ट्विटनंतर काही युजर्सनी खास शैलीत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.  


गेल्या काही दिवसांपूर्वी केअरकेने हृतिक- कंगना वादामध्येही उडी घेतली होती आणि कंगनाची बहिण रंगोलीवर निशाणा साधला होता. रंगोलीने केलेल्या ट्वीटवर केओरके प्रतिक्रिया दिली होती.''कंगना २००५ मध्ये भेटली आणि तिचा चित्रपट एप्रिल २००६ मध्ये रिलीज झाला? माझ्याजवळ पाच साक्षीदार आहेत की, तुझी बहीण कंगना आदित्यला २००३ मध्ये भेटली होती,’ असे ट्वीट केआरकेने केले होते. या  ट्विटवर रंगोली चांगलीच भडकली. ‘आण पुरावा, मी तुला चॅलेंज करते. कंगना-आदित्य २००३ मध्ये भेटल्याचा पुरावा दे नाही तर सगळ्यांपुढे नाक रगड विकाऊ कुत्र्या,’ असे रंगोली बोलून गेली.  

अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहिण रंगोली गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन आणि आदित्य पांचोलीवर दररोज एक नवा आरोप करत आहेत. त्याच्या अनुषंगाने केआरकेने करिनासोबतचा फोटो शेअर करत उपरोधिक ट्विट केलं आहे. आता केअरकेच्या या ट्वीट करिना कपूर खान आणि सैफ अली खान काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांने सनी देओल आणि डिंपल कपाडियाचा लंडन रस्त्यांवरच्या फोटोवरुन सुद्धा पंगा घेतला होता. याआधी केआरकेने पोस्टर बॉईजबाबत ट्वीट करुन श्रेयस तळपदे पंगा घेतला होता. श्रेयसने केआरला चांगलेच ट्वीटवर झापले होते. केआरला चांगलीच तंबी श्रेयसने दिली होती.  

ALSO READ : आता केआरकेने सुपरस्टर रजनीकांत आणि मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानशी घेतला पंगा!

Web Title: KARAKO and I have been in a four-year relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.