​‘गुगलच्या सर्च सेलिब्रेटी’मध्ये कपिलने पछाडले दिग्गज कलावंताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 20:54 IST2016-12-04T20:54:53+5:302016-12-04T20:54:53+5:30

‘द कपिल शर्मा शो’ चा सूत्रधार व विनोदाचा बादशाह कपिल शर्माने अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार व सर्व ...

Kapilane's legendary Kalabhavan in Google's search celebrity | ​‘गुगलच्या सर्च सेलिब्रेटी’मध्ये कपिलने पछाडले दिग्गज कलावंताना

​‘गुगलच्या सर्च सेलिब्रेटी’मध्ये कपिलने पछाडले दिग्गज कलावंताना

ong>‘द कपिल शर्मा शो’ चा सूत्रधार व विनोदाचा बादशाह कपिल शर्माने अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार व सर्व बड्या अभिनेत्यांना जोर का धक्का देत गुगलच्या मोस्ट सर्च यादीत ‘टॉप थ्री स्टार’मध्ये स्थान मिळविले आहे. याहू इंडियाने ‘गुगल’सर्च इंजिनवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाºया पुरुष सेलिब्रेटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत कपिल शर्मा दुसºया स्थानी आहे. या यादीत सलमान खान पहिल्या स्थानवर आहे. 

‘द कपिल शर्मा शो’ मुळे कपिलला ही प्रसिद्धी मिळाली होती. ‘किस-किस को प्यार करूं’ चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका साकारली होती, मात्र या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर फारसे यश मिळाले नाही. कपिलला खरी ओळख मिळाली ती टीव्हीवर आपल्या विनोदांनी दिग्गज सेलिब्रेटींना पछाडणाºया ‘कपिल शर्मा शो’या कार्यक्रमामुळे. याहू इंडियाने प्रसिद्ध केलेल्या 2016 टॉप मोस्ट सर्च पुरूष सेलिब्रेटी यादीत कपिल दुसºया स्थानी आहे. कपिलनंतर अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि आमिर खान यांची नावे आहेत. 

kapil sharma beats amitabh bachchan in google most searched celebs list

याहू इंडियाने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाºया सेलिब्रेटींमध्ये सनी लिओनीने आपले प्रथम स्थान कायम राखले आहे. सनी लिओनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूड स्टार सलमान खानला मागे टाकत नंबर एकचे स्थान पटकावले आहे. दरवर्षी याहू इंडिया ही वेबसाईट भारतीय लोक, कार्यक्रम आणि कथानकाच्या आधारावर वर्षभरातील आकडेवारी जारी करते.

kapil sharma beats amitabh bachchan in google most searched celebs list

कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटी त्यांच्या आगामी चित्रपटांच्या प्रसिद्धीकरिता येतात. कपिलने आपल्या कारकिदीर्ची सुरुवात ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज ३’ या या कार्यक्रमातून केली होती. टीआरपी मध्ये ‘द कपिल शर्मा शो’ अनेक आठवडे अव्वल स्थानी कायम होता. 

kapil sharma beats amitabh bachchan in google most searched celebs list

Web Title: Kapilane's legendary Kalabhavan in Google's search celebrity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.