​‘कॉन्टोवर्सी किंग’ केआरकेने रणवीर सिंहला संबोधले अतिरेकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 15:06 IST2017-02-23T09:36:07+5:302017-02-23T15:06:07+5:30

कॉन्टोवर्सी किंग कमाल आर खान याने बॉलिवूडला नुसता वैताग आणलाय, असे म्हटले तरी खोटे ठरू नये. twitterवर आल्या दिवशी ...

Kanwar King: KRK has called the Ranveer Singh | ​‘कॉन्टोवर्सी किंग’ केआरकेने रणवीर सिंहला संबोधले अतिरेकी!

​‘कॉन्टोवर्सी किंग’ केआरकेने रणवीर सिंहला संबोधले अतिरेकी!

न्टोवर्सी किंग कमाल आर खान याने बॉलिवूडला नुसता वैताग आणलाय, असे म्हटले तरी खोटे ठरू नये. twitterवर आल्या दिवशी सेलिब्रिटींबद्दल वाट्टेल ते बोलणे, हा केआरके अर्थात  कमाल आर खानचा आवडता उद्योग. काल परवा कमाल खानने अभिनेत्री स्वरा भास्करला डिवचले. स्वरा भास्करचा ‘अनारकली आॅफ आरा’ हा सिनेमा येत आहे. या सिनेमाचे  पोस्टर रिलीज झाल्यावर त्यातील स्वराच्या लूकची जोरदार चर्चा आहे. खुद्द करण जोहरने स्वराला शाब्बासकी दिलीय. पण केआकेच्या हे पचनी पडले नाही आणि त्याने स्वराला डिवचलेच. ‘स्वराचा हा सिनेमा फ्लॉप किंवा बेकार नसेल तर या वर्षांतला सुपर डुपर बकवास सिनेमा असेल,’ असे tweet त्याने केले. (केआरकेच्या या tweet ला स्वरानेही त्याच्याच शब्दांत उत्तर दिले. काही लोकांच्या शिव्याही कॉम्लिमेंट ठरतात. थॅँक्स कमाल राशिद खान... ज्या पद्धतीने अश्लीलता पसरविली आहे, त्यावरून हेच तुझे कॅरेक्टर सर्टिफिकेट असावे. खरोखर मला तुझे कौतुक करावेसे वाटतेय, अशा शब्दांत तिने केआकेला सुनावले. पण कदाचित स्वराच्या या वाक्यांचाही केआरकेवर फार परिणाम झाला नाही.)

ALSO READ :Tweet war : स्वरा भास्करने केआरके म्हटले ‘कॅरेक्टरलेस’
कॉन्ट्रोवर्सी किंग

स्वरानंतर केआकेने अभिनेता रणवीर सिंह याला लक्ष्य केले आहे. केआरकेने त्याच्या twitter अकाऊंटवर रणवीरचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि सोबत काय लिहिलेय, माहितीय? त्याने चक्क रणवीरला आयएसआयएसचा अतिरेकी संबोधले. (कमालने रणवीरचा जो फोटो पोस्ट केला आहे, त्याची बरीच चर्चा झाली होती. या फोटोची तुलना ‘कंडोम’सोबत केली गेली होती.)

{{{{twitter_post_id####}}}}


केआरकेच्या या tweet वर रणवीर काही बोलणार याआधीच त्याच्या चाहत्यांनी कमालचा चांगला क्लास घेतला. पण तरिही रणवीर यावर काय उत्तर देतो, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.

आरकेने आत्तापर्यंत ब-याच बॉलिवूड सेलिब्रिटींचा अपमान केला. सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट अशा अनेक अभिनेत्रींबद्दल केआरकेने आक्षेपार्ह टीप्पणी केली आहे. सोनाक्षीने यानंतर  केआरकेला चांगलेच फैलावर घेतले होते. तर आलियाच्या बचावार्थ सिद्धार्थ मल्होत्रा पुढे आला होता. अशाच एका प्रकरणात सनी लिओनीने केआरकेविरूद्ध सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. 

Web Title: Kanwar King: KRK has called the Ranveer Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.