कंगना पुन्हा होणार ‘क्विन’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 14:39 IST2016-10-10T13:04:30+5:302016-10-17T14:39:47+5:30
कंगना रानौतचा ‘क्विन’ अवतार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटील येणार असल्याची माहिती मिळत आहे. 2014 साली प्रदर्शित झालेल्या ‘क्विन’ चित्रपटाचा ...
.jpg)
कंगना पुन्हा होणार ‘क्विन’ !
क गना रानौतचा ‘क्विन’ अवतार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटील येणार असल्याची माहिती मिळत आहे. 2014 साली प्रदर्शित झालेल्या ‘क्विन’ चित्रपटाचा सिक्वल तयार करण्याची तयारी दिग्दर्शक विकास बहल करीत असल्याचे समजते.
‘क्विन’मध्ये तिने राणी नावाच्या एका मुलीची भूमिका केली होती. तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली होती. ‘क्विन’मधील अभिनयासाठी कंगनाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शिवाय बॉक्स आॅफिसवरही या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती. त्या वर्षीचा ‘क्विन’ हा सर्वांत मोठा चित्रपट ठरला होता,
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘क्विन’च्या सिक्वलवर दिग्दर्शक विकास बहल याने काम करण्याचे संकेत दिले आहेत. सध्या विकास या चित्रपटाच्या कथेवर काम करीत आहे. मात्र यासाठी थोडा वेळ लागणार असून ड्राफ्ट व स्क्रिप्ट तयार झाल्यावरच भूमिके विषयी कंगनाशी बातचित केली जाणार आहे. मात्र या भूमिकेसाठी कंगना हीच पहिली पसंती राहणार असून ती यासाठी होकार देईल अशी आशा विकास बहल यांना आहे.
विकास बहलने दिग्दर्शित केलेल्या ‘क्विन’ या चित्रपटाने 100 कोटीहून अधिक कमाई केली होती. ही कमाई बजेटच्या तीनपट होती. या चित्रपटाच्या यशानंतर कंगनाने आपली फी वाढविण्याची घोषणा केली होती. कंगना सध्या तिचा आगामी चित्रपट ‘रंगून’मध्ये व्यस्त असून यात शाहीद कपूर व सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 14 आॅक्टोंबरला प्रदर्शित होणार असल्याचे क ळते.
![]()