​कंगना राणौतची बहीण रंगोलीचा चढला पारा! हृतिक रोशलला म्हणाली, ‘अंकल, कंगनाला विसर’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 12:18 IST2017-10-03T06:47:29+5:302017-10-03T12:18:00+5:30

कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांचा वाद थंड झालाय, असे आपल्याला वाटत असले तरी असे नाहीच. पुन्हा एकदा हृतिक ...

Kangana Ranaut's sister rangoli increased mercury! Hrithik told Rochelle, 'Uncle, forget the Kangana' !! | ​कंगना राणौतची बहीण रंगोलीचा चढला पारा! हृतिक रोशलला म्हणाली, ‘अंकल, कंगनाला विसर’!!

​कंगना राणौतची बहीण रंगोलीचा चढला पारा! हृतिक रोशलला म्हणाली, ‘अंकल, कंगनाला विसर’!!

गना राणौत आणि हृतिक रोशन यांचा वाद थंड झालाय, असे आपल्याला वाटत असले तरी असे नाहीच. पुन्हा एकदा हृतिक व कंगनाच्या वादाला हवा मिळाली आहे. गत महिन्यात ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात कंगना आली आणि हृतिकबद्दल नाही नाही ते बोलून गेली. हृतिक यावर शांत होता. पण पण काल मीडियात एक भलतीच बातमी आली. ‘रिपब्लिक टीव्ही’ने हृतिक रोशनने कंगनाविरोधात दाखल केलेली याचिका सार्वजनिक केली अन् सगळीकडे खळबळ माजली. (अर्थात हृतिकच्या वकीलांनी ही तक्रार जुनीच असल्याचे म्हटले आहे.)  हृतिक व कंगनाची केस अद्याप बंद झालेली नाही, अशी बातमी मग कानोकानी झाली. कंगनाने बराच काळ माझा पिच्छा पुरवला. ती मला सेक्शुअल मेल करायची, असे हृतिकने आपल्या तक्रारीत म्हटले असल्याचेही ‘पब्लिक’ झाले.  या तक्रारीने कंगनाचा नाही पण तिची बहीण रंगोली हिचा संताप चांगलाच अनावर झाला. हृतिकने कंगनाविरोधात तक्रार केली हे रंगोलीने ऐकले आणि तिचा संतापाचा फुगा फुटला.



मग काय, tweetवर रंगोलीच्या ‘हृतिकविरोधी’ tweetचा पूर आला. रंगोलीने एका पाठोपाठ एक असे अनेक tweet करत हृतिकला चांगलेच आडव्या हातांनी घेतले. ‘ तुम्ही तुमचा चेहरा लपवण्यासाठी काय करू शकता?’ या tweetने रंगोलीने सुरुवात केली. ती इथेच थांबली नाही तर पुढच्या tweetमध्ये हृतिकवर तिने थेट प्रहार केला. ‘तुझा पहिला चित्रपट आला तेव्हा कंगना शाळेत होती. 



ALSO READ : OMG!! कंगना राणौत अडचणीत; आदित्य पांचोलीने पाठवली मानहानीची नोटीस!

 फिल्म इंडस्ट्रीत नसती तर ती तुला अंकल म्हणाली असती,’असे tweet रंगोलीने केले. ‘कंगनासारखी सुंदर, प्रतिभावान आणि श्रीमंत मुलीला तुझ्यासारख्या अंकलमागे धावण्याची काहीही गरज नाही. नेहमी ती नाही तर तूच तिच्या मागे होतास. ती कधीच तुझ्या मागे पडली नव्हती,’असेही रंगोलीने म्हटले . रंगोलीचा राग इथेच शांत झाला नाही. तर ती पुन्हा बरसली. ‘तू अजूनही तिला बदनाम करण्यासाठी तिच्यामागे पडला आहेस. कदाचित तुझ्याकडे करण्यासारखे काहीही नाही. यावेळी पिच्छा करणारा कोण आहे, हे कुणीही सांगू शकेल. कंगनाला विसर. ती बरीच लांब निघून गेलीय. पिच्छा करण्यापेक्षा अंकल, तू आपल्या पत्नी व मुलांकडे लक्ष दे,’ असे रंगोलीने म्हटले.

Web Title: Kangana Ranaut's sister rangoli increased mercury! Hrithik told Rochelle, 'Uncle, forget the Kangana' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.