कंगना रणौतच्या सिमरनचे नवे पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 18:15 IST2017-08-08T12:45:05+5:302017-08-08T18:15:05+5:30

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत हळूहळू आता आपला आगामी चित्रपट सिमरनच्या प्रमोशनची तयारी सुरु केली आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि ...

Kangana Ranaut's Simran's new poster-out | कंगना रणौतच्या सिमरनचे नवे पोस्टर आऊट

कंगना रणौतच्या सिमरनचे नवे पोस्टर आऊट

लिवूडची क्वीन कंगना रणौत हळूहळू आता आपला आगामी चित्रपट सिमरनच्या प्रमोशनची तयारी सुरु केली आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि टीजरने प्रेक्षकांमध्ये याआधीच उत्सुकता निर्माण केली आहे. ज्यानंतर प्रेक्षक ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. 8 ऑगस्टला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. याआधी निर्मात्यांनी चित्रपटाचे आणखीन एक नवे पोस्टर रिलीज केले आहे, ज्यात लाल रंगाच्या ड्रेसमध्ये कंगना रणौत बसून हसताना दिसते आहे. पोस्टरसोबत चित्रपटाचा ट्रेलर आऊट होण्याचे टायमिंगसुद्धा टाकण्यात आले आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक हंसल मेहता आहे. 



also read : कंगना राणौत सुसाट ! कथालेखनाचे श्रेय घेतल्यानंतर ‘सिमरन’च्या एडिटींग टेबलवर कब्जा!!

काही दिवसांआधी चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला होता. ज्यात कंगना खूप वेगवेगळ्या लुक्समध्ये दिसली होती. तसेच व्हिडीओमध्ये ती बिनधास्त अंदाजात दिसली होती. या व्हिडीओत कंगान 10 वेगवेगळ्या लुक्समध्ये दिसली होती. कंगनाची या चित्रपटातील भूमिका एक बिनधास्त मुलीची आहे जी आयुष्य आपल्या तत्वांवर जगते. या चित्रपटाचे कथेवरचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न कंगनाने केल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला होता. यावरुन चित्रपटाचा पटकथा लेखक अपूर्व असरानी आणि कंगना यांच्यात जुंपली होती. या चित्रपटाच्या कथेसाठी आपण आपल्या आयुष्यातील 2 वर्ष खर्च केली आहेत असे अपूर्व असरानीचे म्हणणे होते. चित्रपटाच्या दिग्दर्शकाने आपल्याला समजावल्यानंतर मी को-राईटर म्हणून तिचे नाव देण्यास तयार झाला,  नाही तर चित्रपट फसला असता असे असरानीचे म्हणणे आहे. 
काही दिवसांपूर्वी कगंनाला 'मणिकर्णिका :द क्वीन ऑफ झांसी'च्या शूटिंग दरम्यान अपघात झाला होता. यानंतर ती आराम करण्यासाठी काही दिवस आपल्या हिमाचलमधल्या घरी गेली होती. या चित्रपटात ती राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारणार आहे. कगंनासह यात अंकिता लोखंडे आणि अतुल कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका आहे.    

Web Title: Kangana Ranaut's Simran's new poster-out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.