​कंगना राणौतची ही टी-शर्ट ‘इशारों इशारों में’ दिलेला मॅसेज तर नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 14:53 IST2017-10-16T09:23:38+5:302017-10-16T14:53:38+5:30

कंगना राणौतच्या आरोपांना हृतिक रोशनने नॅशनल टीव्हीवर उत्तर दिले. खरे तर हृतिकच्या उत्तरावर कंगना काहीतरी बोलेल, आणखी नवे खुलासे ...

Kangana Ranauti is not the only T-shirt 'gesture gesture' message? | ​कंगना राणौतची ही टी-शर्ट ‘इशारों इशारों में’ दिलेला मॅसेज तर नाही?

​कंगना राणौतची ही टी-शर्ट ‘इशारों इशारों में’ दिलेला मॅसेज तर नाही?

गना राणौतच्या आरोपांना हृतिक रोशनने नॅशनल टीव्हीवर उत्तर दिले. खरे तर हृतिकच्या उत्तरावर कंगना काहीतरी बोलेल, आणखी नवे खुलासे करेल, अशी अपेक्षा होती. पण अद्याप कंगनाने हृतिकच्या मुलाखतीवर एक अवाक्षरही काढलेले नाही. हृतिकच्या मुलाखतीवर काही तर बोल, असा सल्ला काल-परवा कंगनाच्या मॅनेजरने तिला देऊन पाहिला. पण कंगनाने तिचा हा सल्ला मानण्याऐवजी तिलाच चूप बसवले.  साहजिक हृतिकबद्दल रोज नवे खुलासे करणारी कंगना अचानक इतकी शांत का झाली? हेच  अनेकांना  कळेनासे झालेय. पण आम्हाला विचाराल तर कंगना अजिबात शांत झालेली नाही. फरक इतकाच की,  जगासमोर ओरडून सांगण्याऐवजी ‘इशारों इशारों में’ उत्तर देण्याचे धोरण कंगनाने सध्या स्वीकारले आहे. विश्वास बसत नाही तर या बातमीसोबत कंगनाचे हे फोटो जरा बारकाईने बघा. विमानतळावर टीपलेले कंगनाचे हे फोटो अगदी ताजे आहेत. 



ALSO READ: हृतिक रोशनमुळे आपल्या मॅनेजरवर बरसली कंगना राणौत! वाचा, सविस्तर बातमी!!

यात कंगना अगदी कज्युअल लूकमध्ये दिसतेय. म्हणजे, पांढरी टी-शर्ट आणि खाली टाऊजर. आता तुम्ही म्हणाल या फोटोंमध्ये काय आहे? तर या फोटोतच सगळे रहस्य दडलेले आहे. कंगनाने घातलेली टी-शर्ट बघा. त्यावर इंग्रजीत काहीतरी लिहिलेय. होय,‘Merci Mon Cheri’ असे शब्द त्यावर दिसत आहेत. या तीन शब्दांचा अर्थ तुम्हाला सहजी कळणार नाही. कारण त्यासाठी तुम्हाला फ्रेंच यायला हवी. होय, फ्रेंच भाषेतील या शब्दांचा अर्थ आहे ‘थँक्यू यू हनी.’ (आता या ‘थँक्यू यू हनी’चा अर्थ आपण लावू शकणार नसू तर आपल्या इतके मूर्ख आपणच म्हणायचे. )  कंगनाचे हे ‘थँक्यू यू हनी’ बरेच काही सांगणारे आहे. हृतिकने किमान तोंड उघडले म्हणून कंगना त्याचे धन्यवाद मानत असावी किंवा  तिला हा वाद कायमचा संपवा म्हणून तिने ‘थँक्यू यू हनी’ म्हटले असावे किंवा पुन्हा एकदा हृतिकला डिवचायची संधी तिने यातून साधली असावी. शक्यता अनेक आहे. पण कंगनाच्या या ‘थँक्यू यू हनी’ मागे काही तर हिंट आहे हे नक्की. कारण तुम्हालाही चांगलेच ठाऊक आहे. कारण, कंगना इतक्या सहजी हार मानणाºयांपैकी मुळीच नाही.

Web Title: Kangana Ranauti is not the only T-shirt 'gesture gesture' message?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.