'वाईट स्वप्न होतं ते...'; शाहिद कपूरसोबत कॉटेज शेअर करून वैतागली होती कंगना राणौत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 06:02 PM2022-02-07T18:02:11+5:302022-02-07T18:06:52+5:30

कंगना राणौत (kangana Ranaut) आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते.

kangana ranaut was annoyed with shahid kapoor during rangoon shoot | 'वाईट स्वप्न होतं ते...'; शाहिद कपूरसोबत कॉटेज शेअर करून वैतागली होती कंगना राणौत

'वाईट स्वप्न होतं ते...'; शाहिद कपूरसोबत कॉटेज शेअर करून वैतागली होती कंगना राणौत

googlenewsNext

कंगना राणौत (kangana Ranaut) आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. कंगना कोणत्याना कोणत्या गोष्टीमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती अनेक वेळा बॉलिवूडच्या विरोधात बोलताना दिसते. ती तिच्या मुलाखतींमध्ये मजेदार खुलासेही करत असते. कंगनाला कोणाती गोष्टी खटकली तर ती बिनधास्त सांगते. एका जुन्या मुलाखतीत तिने शाहिद कपूर(Shahid Kapoor) बद्दलही असेच काहीसे सांगितले होते, ज्यानंतर दोघांमधील मतभेदाच्या बातम्या येऊ लागल्या. कंगनाने शाहिदसोबत 'रंगून' चित्रपटात काम केले आहे. शाहिदसोबत कॉटेज शेअर करताना तिला वाईट अनुभव आल्याचे तिने सांगितले होते.

कंगना रणौतने मिड डेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही दूरच्या ठिकाणी शूटिंग करत होतो. अशीच एक झोपडी आमच्यासाठी तिथे बांधली होती. शाहिद आणि मी आपापल्या टीमसोबत एकाच कॉटेजमध्ये होतो. रोज सकाळी माझे डोळे त्याच्या हिप-हॉप संगीताने उघडले. तो रोज स्पीकरवर विचित्र ट्रान्स आणि टेक्नो म्युझिकचा व्यायाम करत असे. मी कंटाळले होते आणि तिथून शिफ्ट व्हायचं होतं. शाहिदसोबत कॉटेज शेअर करणे हे एक वाईट स्वप्न होते.

या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहिद आणि कंगनाच्या भांडणाच्या बातम्याही आल्या होत्या. शाहीद म्हणत होतो दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे. तर दुसरीकडे कंगनाने उघडपणे तिची नाराजी व्यक्त केली होती.

Web Title: kangana ranaut was annoyed with shahid kapoor during rangoon shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.