बॉलिवूडच्या ‘या’ टॉप अभिनेत्रीला हे झाले तरी काय? सोशल मीडियावर फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 13:20 IST2019-09-20T13:16:46+5:302019-09-20T13:20:53+5:30
ओळखा पाहू कोण?

बॉलिवूडच्या ‘या’ टॉप अभिनेत्रीला हे झाले तरी काय? सोशल मीडियावर फोटो व्हायरल
अभिनेत्री कंगना राणौतचा ‘जजमेंटल है क्या’ हा अलीकडे प्रदर्शित झालेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. लवकरच कंगना तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित ‘जया’ या बायोपिकमध्ये झळकणार आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तिचे काही फोटो व्हायरल होत आहे. कंगनाच्या टीमने हे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत कंगना प्रोस्थेटिक मेकअप करताना दिसत आहे. म्हणजेच, प्रोस्थेटिक मेकअपच्या मदतीने कंगना जयललितांचा लूक साकारणार आहे. या प्रोस्थेटिक मेकअपमुळे कंगनाला श्वास घेण्यास अडथळा येत होता. पण तरीही तिने नेटाने हे मेकअप केले.
काही दिवसापूर्वीच लूक टेस्ट करण्यासाठी ती लॉस एंजलिससाठी रवाना झाली होती. हॉलिवूडचे सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट जॅसन कोलिंस यांनी ही लूक टेस्ट घेतली. जॅसन यांनी कॅप्टन मार्वेल आणि ब्लेड रनर 2049 या चित्रपटांसाठी काम केले आहे.
गेल्या काही वर्षांत हॉलिवूडप्रमाणेच बॉलिवूडमध्येही प्रोस्थेटिक मेकअपची मदत घेतली जात आहे. यापूर्वी पा, 102 नॉट आऊट, फॅन अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी या मेकअपचा वापर करण्यात आला होता. आता कंगनाच्या चित्रपटासाठीही या मेकअपची मदत घेतली जाणार आहे.
एकंदर काय तर कंगना आपल्या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतेय. या चित्रपटासाठी सध्या ती भरतनाट्यम आणि तामिळ भाषा शिकतेय. या सगळ्या तयारीनंतर दिवाळीदरम्यान या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. तामिळ, तेलगू, हिंदी अशा तीन भाषांत तयार होत असलेल्या या चित्रपटासाठी कंगनाने 20 कोटी इतकी भरमसाठ फी घेतल्याची चर्चा आहे.