चर्चेत राहण्यासाठी एकही संधी सोडत नाही कंगणा राणौत, मनालीच्या द-या खो-यात एक दिवस गेली आणि.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 15:48 IST2020-07-06T15:45:55+5:302020-07-06T15:48:55+5:30
निवांत क्षण एन्जॉय करत असलेल्या कंगनाने अलीकडेच कुटुंबासोबत एका सहलीचे आयोजन केले होते. येथे ती सगळ्यांसोबत मस्तीच्या अंदाजात दिसली.

चर्चेत राहण्यासाठी एकही संधी सोडत नाही कंगणा राणौत, मनालीच्या द-या खो-यात एक दिवस गेली आणि.....
बॉलीवुडची क्वीन कंगणा राणौत बॉलीवुडची ट्रेंडसेटर म्हणून ओळखली जाते. एरव्ही कामाच्या बिझी शेड्युअलमुळे कलाकारांना कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी हवा तसा वेळ मिळत नाही. लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच कलाकरांना कुटुंबासह एन्जॉय करण्यासाठी इतका वेळ मिळाला आहे. आपल्या मनालीतील घरी कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. निवांत क्षण एन्जॉय करत असलेल्या कंगनाने अलीकडेच कुटुंबासोबत एका सहलीचे आयोजन केले होते. येथे ती सगळ्यांसोबत मस्तीच्या अंदाजात दिसली.
विशेष म्हणजे कंगणाची तिच्या कुटुंबासह ही पहिली कौटुंबिक सुट्टी आणि पिकनिक होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या आरामदायी आणि ऐशोआरामाच्या स्टाईलची कायमच चर्चा असते. मात्र या कलाकारांच्या जीवनातही धावपळ काही कमी नसते. रोजची दगदग आणि कामाचा ताण कलाकारांवर असतो. कामासाठी कायम एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी त्यांना जावं लागतं. त्यामुळे त्यांच्याकडे वेळ हा नसतोच.
पाऊस येण्यापूर्वी तिला उन्हाळ्यातील काही क्षणांचा घराबाहेर आनंद घ्यायचा होता. ग्रीन झोनमध्ये असूनही, परवानगीसाठी आम्हाला एक लांब प्रक्रिया करावी लागली. आम्हाला मदत केल्याबद्दल हिमाचलच्या सर्व अधिका-यांचे आभार. ही एक महत्त्वाची सहल होती', असे सांगितले.
त्यामुळे आहे तो वेळ सत्कर्मी लावत कंगणा कुटुंबासह बाहेर पडली. कधी तलावाच्या पाण्याचा आनंद घेत आहे तर कधी डोंगरद-यात मस्ती करताना दिसतेय. व्हिडिओमध्ये कंगना, तिची बहीण रंगोलीचे कुटुंब, पालक आणि काही जवळचे नातेवाईक दिसत आहेत.