कंगणा राणौत रिअल लाईफमध्येही आहे 'क्वीन', इतक्या कोटींची आहे मालकीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 16:05 IST2020-12-04T16:02:08+5:302020-12-04T16:05:27+5:30
सध्या दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर कंगनाची टिवटिव सुरु आहे.या आंदोलनात सहभागी एका वृद्ध महिलेची खिल्ली उडवणारे ट्वीट तिने अलीकडे केले होते. यावरून ती जबरदस्त ट्रोल होतेय.

कंगणा राणौत रिअल लाईफमध्येही आहे 'क्वीन', इतक्या कोटींची आहे मालकीण
कंगना राणौत अनेक मुद्यावर बेधडक बोलते, अनेकांना वाट्टेल ते सुनावते, अनेकांवर बोचरी टीका करते. पण याऊलट तिच्यावर टीका होते, तेव्हा तह पेटून उठते. कंगनाही ही बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्रीच नाहीतर सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. कंगना एका सिनेमासाठी भारीभक्कम मानधन घेते.
इतकेच नाही तर कंगनाने स्वत: सिनेमा निर्मिती देखील सुरू केली आहे.टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार कंगना रानौत एका सिनेमासाठी 11 कोटी रुपये इथके मानधन घेते. कंगनाला 'मणिकर्णिका' आणि 'पंगा' सारख्या सिनेमाच्या भरघोस यशानंतर बर्याच जाहिरातीही मिळू लागल्या आहेत. प्रमोशनल शूटसाठी दिवसानुसार कंगना वाढीव मानधन घेते. कंगना रानौत एका दिवसाच्या प्रमोशनल शूटिंगसाठी दीड कोटी रुपये घेत असल्याचे समजतंय.
कंगनाची एकूण संपत्तीचा आकड्याची ठोस नोंद नसली तरीही फोर्ब्स 2019 च्या यादीनुसार कंगनाने एका वर्षात 17.5 कोटी रुपये कमावले आहेत. यासह कमाईच्या बाबतीत कंगना 100 सेलिब्रिटींच्या यादीत 70 व्या स्थानावर आहे.कंगना दरवर्षी कोट्यवधी कर भरते. गेल्या काही वर्षांत कंगनाने रिअल इस्टेटमध्येही बरीच गुंतवणूक केली आहे.
मुंबईतही कंगनाची कोटींची संपत्ती आहे.यासह कंगनाला आलिशान गाड्यांचीही आवड आहे.
रिपोर्ट्सनुसार कंगनाकडे मर्सिडीजसह अनेक लक्झरी गाड्यांडे कलेक्शन आहे. कंगनाने 2006 साली 'गँगस्टर' सिनेमातून करिअरची सुरूवात केली होती. यानंतर, तनु वेड्स मनु, फॅशन आणि मणिकर्णिका यासारख्या हिट सिनेमानंतर कंगनाने तीन राष्ट्रीय पुरस्कारही जिंकले.अशा प्रकारे कंगणाला आज बॉलिवूडची क्वीन म्हणूनही ओळखले जाते.
ओ, करण जोहर के पालतू...! दिलजीत दोसांजच्या टीकेनंतर कंगनाचा थयथयाट
सध्या दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर कंगनाची टिवटिव सुरु आहे.या आंदोलनात सहभागी एका वृद्ध महिलेची खिल्ली उडवणारे ट्वीट तिने अलीकडे केले होते. यावरून ती जबरदस्त ट्रोल होतेय. दिलजीत दोसांज याने कंगनाच्या याच ट्वीटवर सणसणीत प्रतिक्रिया दिली. ‘कंगना, पुराव्यासोबत हे ऐक. बंदा इतना भी अंधा नहीं होना चाहिए,’अशा शब्दांत त्याने एक व्हिडीओ शेअर करत दिलजीतने कंगनाला फटकारले. मग काय कंगनाची सटकली. तिने दिलजीतला असा काही रिप्लाय दिला की, तिचे ट्वीट वाचून सगळेच हैराण झालेत.