तुम्ही एक राजकारणी आहात, आशा आहे ...! कंगना आता केजरीवालांवर बरसली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 10:27 AM2021-02-14T10:27:10+5:302021-02-14T10:27:41+5:30

 दिल्लीतील रिंकू शर्मा हत्येप्रकरणी कंगनाने केजरीवाल यांना डिवचणारे ट्विट केले आहे.

kangana ranaut gets trolled after tweeting on delhi cm arvind kejriwal |  तुम्ही एक राजकारणी आहात, आशा आहे ...! कंगना आता केजरीवालांवर बरसली

 तुम्ही एक राजकारणी आहात, आशा आहे ...! कंगना आता केजरीवालांवर बरसली

googlenewsNext
ठळक मुद्देदिल्लीमध्ये २५ वर्षीय रिंकू शर्मा या तरुणाची त्याच्याच शेजारी राहणा-यांकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना सध्या चित्रपटांपेक्षा तिच्या सोशल मीडिया कमेंट्समुळे चर्चेत आहे. असा एकही मुद्दा नाही, ज्यावर कंगना बोलत नाही. यामुळे ती ट्रोलही होते. आता कंगनाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.  दिल्लीतील रिंकू शर्मा हत्येप्रकरणी तिने केजरीवाल यांना डिवचणारे ट्विट  केले आहे.

अरविंद केजरीवाल यांचे २०१५ मधील एक ट्विट शेअर करत कंगनाने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. आपल्या या ट्विटमध्ये केजरीवाल यांनी दादरीच्या मॉब लिचिंगमध्ये मारल्या गेलेल्या इखलाखच्या घरी भेट देणार असल्याची माहिती दिली होती. केजरीवाल यांच्या या ट्विटचा संदर्भ देत कंगनाने लिहिले, ‘केजरीवालजी, मला आशा आहे की,तुम्हीदेखील रिंकू शर्माच्या कुटुंबीयांना भेटून त्यांना पाठिंबा द्या. तुम्ही एक राजकारणी आहात. आशा आहे आता ‘स्टेटमॅन’ बनाल,’ असे ट्विट कंगनाने केले.

अर्थात या ट्विटनंतर कंगना जोरदार ट्रोलही झाली. दिल्ली पोलिस राज्याच्या नाही तर केंद्र सरकारच्या अधिकाराखाली येतात, याची युजर्सने कंगनाला आठवण करून दिली. केजरीवालांना सल्ला देणा-या कंगनाला अनेकांनी खरीखोटी सुनावली.

तू तर युनिव्हर्सची क्वीन आहे. मग तूच का नाही रिंकू शर्माच्या घरी जात, त्याच्या कुटुंबाचे सांत्वन करत? असा सवाल एका युजरने तिला केला. तुला ट्विट करून सांगण्याची गरज नाही. केजरीवाल यांना त्यांची जबाबदारी माहिती आहे, अशा शब्दांत एका युजरने तिला सुनावले.

दिल्लीमध्ये २५ वर्षीय रिंकू शर्मा या तरुणाची त्याच्याच शेजारी राहणा-यांकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. पीडित रिंकू शर्मा हा भाजपा युवा मोर्चा आणि विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता होता.
 कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यानुसार, रिंकू आणि शेजारी राहणा-या नसरुद्दीन यांच्यात काही धार्मिक वक्तव्यावरुन वाद काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. बुधवारी रात्री नसरुद्दीन आणि इतर तिघे जबरदस्ती घरात घुसले आणि रिंकूच्या पाठीवर चाकूने वार केला. व्यवसायिक वादातून हत्या झाल्याचा दावा केला आहे. याऊलट विश्व हिंदू परिषदेने मात्र राम मंदिरासाठी निधी जमा करण्यावरुन रिंकूची हत्या झाल्याचा दावा केला आहे.

Web Title: kangana ranaut gets trolled after tweeting on delhi cm arvind kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.