कंगना रणौतने सैफ अली खानच्या ओपन लेटरला दिले चोख प्रतिउत्तर..वाचा सविस्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2017 15:45 IST2017-07-22T10:10:53+5:302017-07-22T15:45:41+5:30
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये ‘भाई-भतीजा' वाद रंगतो आहे. आयफा 2017च्या मंचावर दरम्यान करण जोहर, सैफ अली खान आणि वरुण ...
.jpg)
कंगना रणौतने सैफ अली खानच्या ओपन लेटरला दिले चोख प्रतिउत्तर..वाचा सविस्तर!
ग ल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये ‘भाई-भतीजा' वाद रंगतो आहे. आयफा 2017च्या मंचावर दरम्यान करण जोहर, सैफ अली खान आणि वरुण धवन यांनी मिळून याच मुद्द्यावर कंगना राणौतची खिल्ली उडवली होती. त्यानंतर या तिघांना ही नेटिझन्सनी धारेवर धरले होते. नोटिझन्सची शिकार झाल्यावर या तिघांनी आप-आपल्या पद्धतीने कंगनाची माफी मागितली होती. वरुणने ट्विटरवरुन मागितली तर सैफने तिला एक ओपन लेटर लिहिले होते. सैफच्या ओपन लेटरवर कंगनाने उत्तर दिले आहे. या प्रकरणावर तिने अखरे आपले मौन सोडले आहे. सैफच्या ओपन लेटरला कंगनाने सुद्धा ओपन लेटर लिहुन चोख प्रतिउत्तर दिले आहे. मिडेमध्ये आलेल्या कंगनाच्या ओपन लेटरमध्ये तिने लिहिले आहे, गेल्या काही दिवसांपासून नेटिझन्सची जोरदार भांडण सुरु आहेत. ज्यातील काही मुद्दे मला प्रचंड आवडले तर काही ऐकून मी हैराण झाले आहे. आजची माझी सकाळ सैफ अली खानचे ओपन लेटर वाचून सुरु झाली जे सध्या सोशल मीडियावर चांगलेच फिरते आहे. सैफचे हे ओपन लेटर वाचून मला तेवढचे दु:ख झाले आहे जेवढे मला यासंबंधी करण जोहरचा ब्लॉग वाचून झाले होते. कंगनाने सैफला उत्तर देताना म्हटले आहे जर आयुष्यात गोष्टी अनुवंशिक पद्धतीनेच झाल्या असत्या तर मला आज अभिनेत्री नाही तर एक शेतकरी व्हायला पाहिजे होते. यानंतर तिने दिलीप कुमार, बिमल रॉय, सत्यजीत राय यांची उदाहरण देखील दिली आहेत.
ALSO READ : आयफाच्या मंचावर ‘जोक्स’वर ‘जोक्स’! कंगना राणौत देणार का उत्तर?
नुकतेच सैफने कंगनाला लिहिल्या ओपन लेटर लिहुन तिची माफी तर मागितली होती. पण त्याचसोबत त्यांने नेटिझन्स आणि स्टारकिड्सच्या बाजूने आपले म्हणणे मांडले होते. सैफच्या याच लेटरला कंगनाने सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.