​कंगना राणौत संतापली; मला बॉलिवूड सोड सांगणारा करण जोहर कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2017 11:23 IST2017-03-09T05:53:32+5:302017-03-09T11:23:32+5:30

बॉलिवूडमध्ये इतका छळ होत असेल तर कंगनाने ही इंडस्ट्री सोडावी,हे  दिग्दर्शक करण जोहरचे शब्द अभिनेत्री कंगना राणौतने करणच्याच घशात ...

Kangana Ranaut furious; Who is Johar Johar to tell me to quit Bollywood? | ​कंगना राणौत संतापली; मला बॉलिवूड सोड सांगणारा करण जोहर कोण?

​कंगना राणौत संतापली; मला बॉलिवूड सोड सांगणारा करण जोहर कोण?

लिवूडमध्ये इतका छळ होत असेल तर कंगनाने ही इंडस्ट्री सोडावी,हे  दिग्दर्शक करण जोहरचे शब्द अभिनेत्री कंगना राणौतने करणच्याच घशात घातले आहेत. होय, करण आणि कंगना यांच्यातील शाब्दिक युद्ध आता वेगळ्याच वळणावर पोहोचले आहेत. आधी ‘कॉफी विद करण’मध्ये कंगनाने करणला डिवचले.  करणला ‘फिल्मी माफिया’ म्हणण्यापर्यंत कंगना गेली. यानंतर करणनेही कंगनाचा खरपूस समाचार घेतला. कंगनाला इतकाच त्रास होत असेल तर तिने बॉलिवूड सोडावे, असा थेट सल्ला देऊन तो मोकळा झाला. पण आता हा सल्ला देणारा करण कोण? असा प्रश्न आम्ही नाही तर कंगनाने उपस्थित केला आहे.  मला इंडस्ट्री सोडायला सांगण्याचा करणला काहीही अधिकार नाही. ही फिल्म इंडस्ट्री म्हणजे त्याच्या वडिलांनी त्याला वयाच्या २० वर्षी भेट दिलेला एखादा स्टुडिओ नाहीयं. ही इंडस्ट्री प्रत्येक भारतीयाची आहे आणि इथे काम करण्याचा माझ्यासकट सर्वांनाच अधिकार आहे. माझ्यासारख्या बाहेरून आलेल्यांना इथे सन्मान मिळतो, असे कंगनाने करणला सुनावले आहेत.



ALSO READ : ​पटत नाही तर बॉलिवूड सोड...करण जोहरने घेतला कंगना राणौतचा बदला!!

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने करणच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. ती अक्षरश: त्याच्यावर तुटून पडली. करण घराणेशाहीच्या संदर्भाने बोलला. पण त्याला घराणेशाहीचा खरा अर्थच माहीत नाहीय. घराणेशाही म्हणजे फक्त तुमची मुलं, भाचें, भावंडं यांनाच काम देणं नव्हे. पण करणने याचाच घराणेशाही असा अर्थ लावता. तो असा अर्थ लावणार असेल तर मी त्याबद्दल काय बोलणार?  मला काम न देण्याचा निर्णय घेतल्याचे तो बोलला. त्याचे हे वक्तव्य कलाकाराची खिल्ली उडवण्यासारखे आहे. कदाचित त्याची स्मरणशक्ती तितकी चांगली नसावी.  कारण आम्ही ‘उंगली’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. हा चित्रपट त्यानेच प्रोड्यूस केला होता. अर्थात आमचे सूर जुळत नसल्याचे आम्हाला लवकरच लक्षात आले, असे कंगना म्हणाली.

मी ‘वूमेन कार्ड’ आणि ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळते असे करण म्हणतो. करण कुठल्या कार्डची गोष्ट करतोय. असे म्हणून त्याने त्या प्रत्येक महिलेचा अपमान केलाय, ज्यांना या कार्डची गरज आहे. एक प्रेग्नंट महिला  ‘वूमेन कार्ड’ दाखवून बसमध्ये जागा मिळवू शकते. अ‍ॅसिड हल्ला झेलणारी माझी बहीण रंगोली ‘व्हिक्टिम कार्ड’ वापरते. जेणेकरून तिला न्याय मिळावा. मी करण जोहरविरूद्ध नाही तर पुरूषी मानसिकतेविरूद्ध लढते आहे, असेही तिने सुनावले.

Web Title: Kangana Ranaut furious; Who is Johar Johar to tell me to quit Bollywood?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.