कंगना राणौत आणि करण जोहर यांच्यातील भांडणामागचे ‘हे’ आहे खरे कारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 13:26 IST2017-03-08T07:56:45+5:302017-03-08T13:26:45+5:30
कंगना राणौत आणि करण जोहर यांच्यातील वादाची चर्चा सध्या सर्वत्र आहे. ‘कॉफी विद करण’मध्ये कंगना गेली आणि करणच्याच शोमध्ये ...

कंगना राणौत आणि करण जोहर यांच्यातील भांडणामागचे ‘हे’ आहे खरे कारण!
क गना राणौत आणि करण जोहर यांच्यातील वादाची चर्चा सध्या सर्वत्र आहे. ‘कॉफी विद करण’मध्ये कंगना गेली आणि करणच्याच शोमध्ये करणलाच नाही, नाही ते बोलून आली. करणला ‘फिल्मी माफिया’ म्हणण्यास तिने मागेपुढे पाहिले नाही. कंगनाचा हा वार करणच्या चांगलाच जिव्हारी लागला. मग काय, आपल्या शोमध्ये तर करण काही बोलला नाही. पण लंडनमधल्या एका इव्हेंटमध्ये करणला कंगना राणौतबद्दल विचारले गेले आणि ही संधी साधून करणने कंगनाचा वचपा काढलाच. मी महिला आहे, या कंगनाच्या वाक्याने आणि तिच्या व्हिक्टिम कार्डने मी परेशान झालोय. जेव्हा केव्हा संधी मिळेल, तेव्हा तुम्ही स्वत:ला एखाद्या पीडित व्यक्तीसारखे सादर करू शकत नाही.जणू काही बॉलिवूडमध्ये तुमच्यावर प्रचंड अत्याचार होत आहेत. बॉलिवूड इतके वाईट असेल तर सोडून द्यावे, असे करण यावेळी बोलून गेला. एकंदर काय तर कंगना व करणचा वाद विकोपाला गेल्याचे यातून दिसतेय.
ALSO READ : पटत नाही तर बॉलिवूड सोड...करण जोहरने घेतला कंगना राणौतचा बदला!!
पण या वादामागे कोण आहे, माहितीय? करण व कंगनातील या कोल्ड वॉरमागे हृतिक रोशन आहे. होय, करण जोहर हृतिक रोशनसोबत चित्रपट बनवणार आहे. हृतिकच्या ‘काबील’मधील अभिनयामुळे करण चांगलाच प्रभावित झाला आहे. कदाचित यामुळे हृतिकचे वादही (हृतिक व कंगनाचा गाजलेला एपिसोड) स्वत:च्या अंगावर ओढवून घ्यायला करण तयार दिसतोय. हृतिकसोबतच्या वादात कंगनाने मनातली सगळी भडास बाहेर काढली होती. बॉलिवूडमध्ये बाहेरच्यांना कसा त्रास सहन करावा लागतो, इथपासून तर तिला आलेल्या अनेक अनुभवांबद्दल ती बोलली होती. कदाचित हीच गोष्ट करणला लागली असावी?