कंगना राणौतच्या आशा का विखुरल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 16:27 IST2017-02-25T10:57:48+5:302017-02-25T16:27:48+5:30

रंगून चित्रपटातील महत्त्वाकांक्षी भूमिका मिस ज्युलियाचे अनेक सीन कट करण्यात आल्याने आशा विखुरल्या गेल्याची खंत बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणौतने व्यक्त केली.

Kangana Ranaoot's hope scattered? | कंगना राणौतच्या आशा का विखुरल्या?

कंगना राणौतच्या आशा का विखुरल्या?

गून चित्रपटातील महत्त्वाकांक्षी भूमिका मिस ज्युलियाचे अनेक सीन कट करण्यात आल्याने आशा विखुरल्या गेल्याची खंत बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणौतने व्यक्त केली.
या चित्रपटातील माझे अनेक सीन्स कट करण्यात आल्याने लोक माझ्या भूमिकेचे कौतुक करतील, असे मला कधीच वाटले नव्हते. हे माझ्या करिअरसाठी महत्त्वाचे होते. ज्यावेळी माझ्या लक्षात आले की, अनेक दृष्ये कापण्यात आली आहेत, त्याचवेळी माझ्या सर्व अपेक्षा विखुरल्या गेल्या. परंतु तरीही माझी भूमिका लोकांना आवडली, त्यामुळे मी खूप आनंदी आहे, असे कंगना म्हणाली.  



रंगून हा चित्रपट दुसºया महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे. विशाल भारद्वाज यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, गत शुक्रवारी तो प्रदर्शित झाला. निर्माता रुस्तुम बिलीमोरिया आणि सैनिक नवाब मलिक या दोघांच्या आयुष्यात मिस ज्युलिया येते. या प्रेमाच्या त्रिकोणावर आधारित ही कथा आहे. रुसी बिलिमोरिया यांचे मिस ज्युलिया यांच्यासोबत प्रेमप्रकरण असते. ते एका कार्यक्रमासाठी ज्युलियाला ब्रह्मदेशात पाठवितात. सोबत सुरक्षेसाठी नवाब मलिकला पाठवितात. या दरम्यान मिस ज्युलिया ही नवाल मलिकच्या प्रेमात पडते. यामुळे कथेला वेगळेच वळण मिळते.
या चित्रपटासंदर्भात वादविवादही खूप झाले. वाडिया मुव्हीटोनने हा चित्रपट १९४० काळातील फिअरलेस नादियाच्या भूमिकेवर आधारित असून, मिस ज्युलियाची भूमिका तिलाच समोर ठेवून तयार करण्यात आली असल्याचे सांगत न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने २ कोटी रुपये डिपॉझिट देण्याच्या अटीवर सशर्त प्रदर्शनास परवानगी दिली.





 

Web Title: Kangana Ranaoot's hope scattered?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.