कंगना बनली ‘धनलक्ष्मी’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 19:57 IST2016-08-10T14:27:33+5:302016-08-10T19:57:33+5:30
कंगना राणौत ही एक गुणी अभिनेत्री आहे, तेवढीच एक जबाबदार नागरिकही आहे. बहीण रंगोलीवरील अॅसिड हल्ल्यानंतर कंगना अॅसिड हल्ल्यातील पीडितांच्या बाजूने उभी झाली. यापाठोपाठ आता कंगना ‘स्वच्छ भारत अभियान’च्या प्रचार-प्रसारासाठी मैदानात उतरली आहे.
.jpg)
कंगना बनली ‘धनलक्ष्मी’!
क गना राणौत ही एक गुणी अभिनेत्री आहे, तेवढीच एक जबाबदार नागरिकही आहे. बहीण रंगोलीवरील अॅसिड हल्ल्यानंतर कंगना अॅसिड हल्ल्यातील पीडितांच्या बाजूने उभी झाली. यापाठोपाठ आता कंगना ‘स्वच्छ भारत अभियान’च्या प्रचार-प्रसारासाठी मैदानात उतरली आहे. आज बुधवारी स्वच्छ भारत अभियानाचे महत्त्व पटवून देणारा एक व्हिडिओ जारी करण्यात आला. कंगना राणौत, अमिताभ बच्चन, ईशा कोप्पीकर, ओमकार कपूर, रवि किशन यासारखे बॉलिवूड कलाकार यात दिसले. या व्हिडिओत कंगना धनलक्ष्मी बनली आहे तर अमिताभ बच्चन यांचा वॉईस ओवर आहे. ‘कहते हैं सुख-संपत्ति की देवी लक्ष्मी है, लक्ष्मी वहीं बस्ती हैं जहां स्वच्छता रहती है.आश्चर्य की बात तो यह है कि जहां एक तरफ हम लक्ष्मी की पूजा करते हैं, वहीं दूसरी तरफ हम गंदगी फैलाते हैं. तो अगली बार कचरा फैलाने से पहले सोच लीजिए, कहीं लक्ष्मी जी आपसे रूठकर चली ना जाएं.’ असा संदेश अमिताभ यात देत आहेत. तेव्हा तुम्हीही बघा तर!!
![]()