​कंगना राणौत मागणार का माफी? मिळणार का आणखी एक कायदेशीर नोटीस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 15:22 IST2017-09-08T09:52:59+5:302017-09-08T15:22:59+5:30

कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील ‘लव्ह अ‍ॅण्ड हेट स्टोरी’चा वाद थांबायची चिन्हे नाहीत. एका वर्षांनंतरही हा वाद अद्यापही ...

Kangana apologizes for asking? Another legal notice to get? | ​कंगना राणौत मागणार का माफी? मिळणार का आणखी एक कायदेशीर नोटीस?

​कंगना राणौत मागणार का माफी? मिळणार का आणखी एक कायदेशीर नोटीस?

गना राणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील ‘लव्ह अ‍ॅण्ड हेट स्टोरी’चा वाद थांबायची चिन्हे नाहीत. एका वर्षांनंतरही हा वाद अद्यापही ताजा आहे. कंगनाने अलीकडे ‘आप की अदालत’ या शोमध्ये या वादाला पुन्हा हवा दिली. हृतिक रोशनसोबतच्या रिलेशनशिपचे एक -एक पान तिने वाचून दाखवले. शिवाय या निमित्ताने अनेक गंभीर आरोपही केलेत. यातलाच एक आरोप होता गुरप्रीत कौर चड्ढा यांच्यावर. होय, महिला काँग्रेसच्या माजी उपाध्यक्ष गुरप्रीत कौर चड्ढा यांच्यावर कंगनाने या शोदरम्यान गंभीर आरोप ठेवला होता.



ALSO READ : ​ हृतिक रोशन, आधी आम्ही तुझा आदर करायचो, पण आता...!!

हृतिकच्या वादात मी मुंबईच्या रिजनल महिला काँग्रेसच्या तत्कालीन उपाध्यक्ष गुरप्रीत कौर चड्ढा यांना मदत मागितली होती. आधी त्यांनी मला मदतीचे आश्वासन दिले होते. पण नंतर त्या बदलल्या, असे कंगनाने म्हटले होते. आता या आरोपावर गुरप्रीत कौर चड्ढा यांनी पलटवार करत, कंगनाला कायदेशीर नोटीस बजावण्याची तयारी चालवली आहे.
कंगनाचा आरोप खोटा आहे. तिने माझ्याशी संपर्क साधला होता. पण तिने कधीच लेखी तक्रार दिली नाही. कंगना व तिची बहीण रंगोली माझ्याकडे आल्या होत्या. मी दोघींशीही बोलले होते.  राकेश रोशन व हृतिक रोशन मोठे लोक आहेत, असेही मी म्हणाले होते. यानंतर या वादाबद्दल मी राकेश रोशन यांच्याशी बोलले. कंगनाने माफी मागावी, असे मला राकेश रोशन म्हणाले होते. मात्र कंगनाने माफी मागण्यास नकार दिला आणि हे प्रकरण आता सायबर क्राईमकडे आहे आणि आता तेच हे प्रकरण हाताळतील, मला सांगितले. यानंतर रंगोलीने माझा फोन घेणे बंद केले. मग मी यावर काय करणार? असे गुरप्रीत यांनी म्हटले आहे. कंगनाने माझी माफी मागावी. अन्यथा कायदेशी कारवाईसाठी तयार राहावे, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title: Kangana apologizes for asking? Another legal notice to get?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.