रजनीकांतसोबत काम करण्यास कमल हासन राजी; पण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 17:59 IST2017-01-24T12:29:58+5:302017-01-24T17:59:58+5:30
सुपरस्टार्स रजनीकांत आणि कमल हासन म्हणजे साऊथ फिल्म इंडस्ट्रिजमधील दोन वेगवेगळी टोकं आहेत. दीर्घकाळापासून ही दोन टोकं एकत्र आलेले ...

रजनीकांतसोबत काम करण्यास कमल हासन राजी; पण?
स परस्टार्स रजनीकांत आणि कमल हासन म्हणजे साऊथ फिल्म इंडस्ट्रिजमधील दोन वेगवेगळी टोकं आहेत. दीर्घकाळापासून ही दोन टोकं एकत्र आलेले नाहीत. चाहते या जोडीला पडद्यावर एकत्र पाहण्यास उत्सूक आहेत. पण दुर्दैवाने चाहत्यांची प्रतीक्षा इतक्यात पूर्ण होईल, याची शक्यता नाही. खुद्द कमल हासन यानेच याचे कारण सांगितलेय. मी रजनीकांतसोबत काम करण्यास तयार आहे. पण आम्हा दोघांना एकत्र आणण्याचा खर्च कुणाला पेलणार? असा सवाल कमलने केला आहे.
रजनीकांत व कमल सध्या जलीकट्टूच्या (तामिळनाडूत खेळला जाणारा बैलांचा पारंपरिक खेळ) समर्थनार्थ लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन करत आहेत. रजनीकांत यांनी तर आंदोलन करणाºया लोकांना उद्देशून एक खुले पत्रही लिहिले आहे. यात त्यांनी हिंसक आंदोलन थांबवण्याची विनंती केली आहे. चेन्नईतील एका पत्रपरिषदेत कमल हासन यानेही जलीकट्टूवरील बंदीच्या निर्णयाला विरोध केला. याच पत्रपरिषदेत पत्रकारांनी कमलला रजनीकांतसोबत स्क्रीन शेअर करण्यासंदर्भात प्रश्न विचारला गेला. मग काय? या प्रश्नावर कमलने सगळ्यांनाच एक आव्हान देऊन टाकले. मी आणि रजनीकांत एकत्र काम करायला तयार होऊ शकतो पण आम्हाला एकत्र कोण अफोर्ड करणार? आम्ही दोघांनी यापूर्वी एकत्र काम केलेयं. पण आता निर्मात्यांसाठी हा महागाचा सौदा ठरेल. आता आमच्यासाठी इतका खर्च कोण करणार? असे कमल म्हणाला.
कमलने दिलेले संकेत स्पष्ट होते. ते म्हणजे, रजनी आणि कमल ही जोडी पुन्हा एकत्र आल्यास त्यांच्या मानधनावरच इतका खर्च होणार की, तेवढ्या खर्चात निर्माते एक मोठी बिग बजेट फिल्म आरामात बनवू शकणार. याऊपरही कमलचे आव्हान स्वीकारणारा एखादा निर्माता असू शकतो. तो मिळालाच तर मग रजनी व कमलची जोडी आपल्याला पुन्हा पडद्यावर दिसणार, हे मात्र नक्की!
Related stories : कमल हासन पुन्हा एकदा म्हणणार ‘शाबाश नायडू’ !
जयललितांबद्दल कमल हासनने केले tweet, सोशल मीडियावर संताप!!
कमल हासनच्या आयुष्यातील महिला...!