कमल हासनने म्हटले, ‘आजही आपण गुलामगिरीतच, खरं स्वातंत्र्य मिळालेच नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 17:03 IST2017-08-16T11:10:12+5:302017-08-16T17:03:25+5:30

प्रसिद्ध अभिनेता कमल हासनने गेल्या मंगळवारी म्हटले की, ‘जोपर्यंत भारतातील जनतेला भ्रष्टाचाराच्या संकटातून मुक्तता मिळणार नाही, तोपर्यंत खºया अर्थाने ...

Kamal Haasan said, "Even today we are in slavery, we have not got freedom" | कमल हासनने म्हटले, ‘आजही आपण गुलामगिरीतच, खरं स्वातंत्र्य मिळालेच नाही’

कमल हासनने म्हटले, ‘आजही आपण गुलामगिरीतच, खरं स्वातंत्र्य मिळालेच नाही’

रसिद्ध अभिनेता कमल हासनने गेल्या मंगळवारी म्हटले की, ‘जोपर्यंत भारतातील जनतेला भ्रष्टाचाराच्या संकटातून मुक्तता मिळणार नाही, तोपर्यंत खºया अर्थाने स्वातंत्र्य मिळणार नाही.’ कमलने याबाबतचे एक ट्विट केले असून, त्याच्या ट्विटला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. त्याने हे ट्विट स्वातंत्र्यदिनीच केल्याने, त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

कमलने ट्विटमध्ये म्हटले की, ‘जोपर्यंत भ्रष्टाचारापासून स्वातंत्र्य मिळणार नाही, तोपर्यंत सर्व गुलाम आहेत. ज्यांच्यात नव्या आजादीच्या आंदोलनात सहभागी होण्याची हिम्मत आहे, त्यांनी सोबत यावे आणि शपथ घ्यावी... विजय आपलाच असेल.’ आणखी एका ट्विटमध्ये कमलने म्हटले की, ‘माझे लक्ष्य आदर्श तामिळनाडू आहे. माझा आवाज आणखी बळकट करण्यासाठी कोण हिम्मत दाखवू शकतो? डीएमके, एआयएडीएमके आणि अन्य पक्ष मदतीसाठीचे शस्त्र आहेत. जर या शस्त्रांवर गंंज चढला असेल तर दुसरे पर्याय शोधावे लागतील.’

यावेळी कमल हासनने हेही प्रश्न उपस्थित केले की, ‘राज्यातील दुर्घटना आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची कोणी का मागणी केली नाही? कोणाच्याही नावाचा उल्लेख न करता त्याने हे ट्विट केले. ट्विटमध्ये पुढे लिहिताना कमलने म्हटले की, ‘आता खूप झाले’! काही दिवसांपूर्वीच कमलने गोरखपूर येथील बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या ७० मुलांच्या मृत्यूविषयी दु:ख व्यक्त केले होते. 

कमल हासनने ट्विट करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना म्हटले होते की, ‘असे पुन्हा घडायला नको’ यावेळी कमलने नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी योगी यांना याविषयी आग्रह करावा, असेही म्हटले होते. दरम्यान, कमल हासनच्या या ट्विटला नेटिझन्सकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बºयाच लोकांनी कमल यांना या लढ्यात आम्ही सहभागी होऊ, असा शब्दही दिला आहे. 

Web Title: Kamal Haasan said, "Even today we are in slavery, we have not got freedom"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.