/>आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी कल्चि कोचलीनच्या डोक्यात आता दिग्दर्शन करण्याची किडा वळवळू लागला आहे. त्यामुळेच चांगली पटकथा मिळाली तर मी दिग्दर्शन करणार, असे कल्की स्वत: सांगत सुटलीय. एका मुलाखतीत कल्कीने डायरेक्टर होण्याची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली. मला भावपूर्ण भूमिका मिळाल्या. यासाठी मी स्वत:ला नशीबवान मानते. पुढेही माझ्या वाट्याला अशा सशक्त भूमिका येतील, अशी आशा मला आहे. चांगल्या पटकथा मिळाल्या तर मी निश्चितपणे दिग्दर्शन करणार. या महत्त्वाकांक्षेने मला नुसते पछाडले आहे, असे कल्किने सांगितले.
Web Title: Kalki will become director
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.