'गणपत'च्या स्क्रीनिंगवेळी लेक युगसोबत दिसली काजोल, लोकांनी ज्युनियर अजय देवगणचं केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 12:01 PM2023-10-20T12:01:05+5:302023-10-20T12:01:24+5:30

Kajol and Her Son Yug : टायगर श्रॉफ आणि क्रिती सनॉन यांच्या 'गणपत' चित्रपटाचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व स्टार्स उपस्थित होते. या सगळ्यामध्ये काजोल तिचा मुलगा युगसोबत कॅमेरासमोर पोझ देताना दिसली.

Kajol seen with son Yug at the screening of 'Ganpat', people praised junior Ajay Devgan | 'गणपत'च्या स्क्रीनिंगवेळी लेक युगसोबत दिसली काजोल, लोकांनी ज्युनियर अजय देवगणचं केलं कौतुक

'गणपत'च्या स्क्रीनिंगवेळी लेक युगसोबत दिसली काजोल, लोकांनी ज्युनियर अजय देवगणचं केलं कौतुक

काही बॉलिवूड स्टार किड्स अनेकदा चर्चेत असतात आणि या यादीतील दोन नावं म्हणजे काजोल (Kajol) आणि अजय देवगण(Ajay Devgan)च्या मुलांची. त्यांची मुलगी न्यासा देवगणच नाही तर त्यांचा मुलगा युग देखील कॅमेऱ्यासमोर येतो तेव्हा त्याची हेडलाइन बनायला वेळ लागत नाही. काल गुरुवारी रात्री टायगर श्रॉफ आणि क्रिती सनॉन यांच्या 'गणपत' चित्रपटाचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व स्टार्स उपस्थित होते. या सगळ्यामध्ये काजोल तिचा मुलगा युगसोबत कॅमेरासमोर पोझ देताना दिसली. मग सोशल मीडियावर युगची चर्चा रंगताना दिसली.

काजोल, जॅकी श्रॉफ, रकुल प्रीत सिंग, अनिल कपूर असे अनेक स्टार्स 'गणपत'च्या स्क्रिनिंगमध्ये दिसले होते. काजोल आपल्या मुलासोबत कॅमेऱ्यासमोर आली तेव्हा त्याच्या हातात पॉपकॉर्न होते. तो त्याच्या आईसोबत दिसला, पण यादरम्यान तो त्याच्या पॉपकॉर्नचा आस्वाद घेताना दिसला. आई आणि मुलाला पाहून लोकांनी खूप कमेंट केल्या. मात्र, काही लोकांनी सवयीने त्याला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
काही लोकांनी खूप विचित्र पद्धतीने युगला ट्रोल केले आणि त्याला आपल्या मुलाला कसे वागावे हे शिकवण्यास सांगितले. मात्र, यावेळी काहींनी युगचे समर्थन केले आणि म्हणाले - तो लहान मुलगा आहे, त्याला हे सर्व माहित नाही. एक म्हणाला- यावरून त्याचा लाइमलाइटशी काहीही संबंध नाही हे दिसून येते.

टायगर श्रॉफचा 'गणपत' आज आला भेटीला
टायगर श्रॉफचा 'गणपत' हा २०२३ सालातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे आणि तो आज २० ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. बॉक्स ऑफिसवर, थलपती विजयचा 'लिओ' देखील या आठवड्यात रिलीज झाला आहे, ज्याने सुमारे ७४ कोटींची जबरदस्त ओपनिंग केली आहे.

Web Title: Kajol seen with son Yug at the screening of 'Ganpat', people praised junior Ajay Devgan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.